प्रा. डॉ. भागवत महाले, डॉ. नितीन जाधव, प्रा. सुरेश भोये, प्रा. श्रीमती कल्पना निकम यांचे राज्यशास्त्र विषयाचे पेटंट कार्यालय भारत सरकार जर्नल्समधून प्रकाशित
डॉ नितीन जाधव
प्रा सुरेश भोये
प्रा . श्रीमती कल्पना निकम
“राजकीय शिक्षण आणि प्रक्षेपण उपकरण ” या संशोधन राज्यशास्त्र विषयात पेटंट मंजूर
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज :नाशिक :मंगळवार :दि 7 नोव्हेंबर 2023
β⇔नाशिक, ता. ७ ( प्रतिनिधी : शाश्वत महाले ) :- शैक्षणिक, सामाजिक प्रश्न, समस्या दूर करण्यासाठी संशोधन करून विद्यार्थ्याना सामाजिक मुल्याबरोबरच स्वतःची बौद्धिक प्रगती योग्य दिशेने होण्याच्या दृष्टीकोनातून योग्य मार्गदर्शकाची भूमिका , नव – नवीन संशोधन कार्य करून समाजाचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. म्हणून संशोधनातून विद्यार्थ्यांना स्वतःची बौद्धिक प्रगती योग्य दिशेने होण्यासाठी संशोधन दृष्टीकोन देवून प्रवाहात आणणे गरजेचे आहे. तरच देशाचे प्रश्न सोडवण्यास मदत होईल, हा संशोधनाचा उद्देश ठेवून सामाजिक शास्त्रातील राज्यशास्त्र विषयात “राजकीय शिक्षण आणि प्रक्षेपण उपकरण ” या संशोधन विषयात मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. भागवत शंकर महाले (त्र्यंबकेश्वर) , मविप्र शिक्षणाधिकारी – प्रा डॉ नितीन कारभारी जाधव (केटीएच एम महाविद्यालय ,नाशिक ), प्रा सुरेश मुरलीधर भोये ( कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सुरगाणा), प्रा. कल्पना देविदास निकम व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी , नाशिक) यांनी एकत्रितपणे राज्यशास्त्र विषयाचे पेटंट (बौध्दिक क्षमता) कार्यालय भारत सरकार शासकीय जर्नल्स मधुन मंजूर होवून प्रकाशित झाले आहे. सदर संशोधन शैक्षणिक क्षेत्रात प्रशासकीय आणि खासगी कार्यात संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कार्य कुशलता व कौशल्य योग्य वापर होण्यास मदत होणार आहे. प्रा डॉ भागवत महाले यांचे हे तिसरे पेटंट प्रकाशित झालेले आहे .
तर प्रा. डॉ नितीन जाधव , प्रा सुरेश भोये, प्रा. श्रीमती कल्पना निकम यांचे हे राज्यशास्त्र विभागाचे पहिले पेटंट शासकीय जर्नल्समधून प्रकाशित झाले आहे . यांच्या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजचे सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे , संस्थेचे अध्यक्ष डॉ . सुनील ढिकले, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था जनरल सेक्रेटरी समाज डाॅ. प्रशांत दादा हिरे, समन्वयक डॉ.अपूर्व हिरे, उपाध्यक्ष .डॉ.हरीश आडके,सहसचिव डॉ.व्ही.एस.मोरे,विश्वस्त डॉ.अद्वय हिरे, विश्वस्त डॉ.बी.एस.जगदाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील, आदीसह पदाधिकारी, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके,शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, शिक्षणाधिकारी डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे व त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पवार, पंचवटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी.एस.जगदाळे, सुरगाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरूण पाटील, आदींसह महाविद्यायातील शिक्षेकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी, मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो.८२०८१८०५१०