नाशिक :⇔ दि.१९ फेब्रुवारी रोजी गोखले एज्युकेशन संस्थेचा वर्धापन दिन-( प्रतिनिधी : छाया लोखंडे )
β : नाशिक :⇔ दि.१९ फेब्रुवारी रोजी गोखले एज्युकेशन संस्थेचा वर्धापन दिन-( प्रतिनिधी : छाया लोखंडे )
दि.१९ फेब्रुवारी रोजी गोखले एज्युकेशन संस्थेचा वर्धापन दिन
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि. 16 फेब्रुवारी, 2024
β⇔ नाशिक, दि.16 ( प्रतिनिधी : छाया लोखंडे ):- महाराष्ट्रातील प्रथितयश शिक्षण संस्था ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’ चा १०६ वा वर्धापन दिन दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या ‘गुरुदक्षिणा’ सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. आयमाचे अध्यक्ष श्री.ललित बूब व सी. आय. आय.चे अध्यक्ष श्री सुधीर मुतालिक हे विशेष अतिथी ह्या नात्याने उपस्थित रहाणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉ.सौ. दीप्ती देशपांडे असणार आहेत. संस्थेचे प्रेसिडेंट डॉ.आर.पी.देशपांडे व चेअरमन डॉ. सौ. सुहासिनी संत ह्यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे.
ह्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. प्रिं एस. बी. पंडित ह्यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. तसेच संस्थेच्या स्वयंप्रकाश व स्वयंप्रेरणा ह्या संशोधनपर नियतकालिकाच्या अंकांचे प्रकाशन होणार आहे. तसेच संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयाच्या ‘स्पेक्ट्रम’ ह्या वार्षिक अंकाचे ही प्रकाशन होणार आहे. ह्या प्रसंगाचे औचित्य साधून संस्थेच्या पीएच.डी. ची उपाधी प्राप्त केलेल्या प्राध्यापकांचा, आपल्या संशोधनातून पेटंट प्राप्त केलेल्या अध्यापकांचा सत्कार करण्यात येणार आहे. उत्कृष्ट कर्मचारी, उत्कृष्ट शिक्षक, उत्कृष्ट वार्षिक अंक, टीचर आँत्राप्रेनर असे पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.
संस्थेचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी , प्रकल्प संचालक श्री पी.एम.देशपांडे, आस्थापना संचालक श्री शैलेश गोसावी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. खंडेलवाल व उपप्राचार्या डॉ. लीना भट ह्यांनी दिली.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो 8208180510