त्र्यंबकेश्वर महाविद्यालयातील कु.फशाबाई लचके विद्यार्थिनीला WEnyan रिसर्च स्कॉलरशिप
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि. 22 ऑक्टोबर 2023
β⇔ त्र्यंबकेश्वर, ता. 21 ( प्रतिनिधी : समाधान गांगुर्डे ) :- त्र्यंबकेश्वर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथील रसायनशास्त्र विभागात शिकणाऱ्या कु. लचके फशाबाई देवराम या विद्यार्थिनीला, पुणे नॉलेज क्लस्टर या संस्थांमार्फत तृतीय वर्ष केमिस्ट्री या विषयाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीस दरवर्षी मिळणार्या बी.ए.एस. एफ. संचालित Wenyan- २०२३ या स्कॉलरशिपसाठी निवड झाली. या अंतर्गत प्रति महिना दहा हजार रुपये असे तीन महिने रिसर्च स्कॉलरशिप दिली जाणार आहे. रसायनशास्त्र विभागातील तीन विद्यार्थिनींनी सदर स्कॉलरशिपसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केले होते. पैकी एका विद्यार्थीनीला पुणे नॉलेज क्लस्टरने स्कॉलरशिप बहाल करण्यात आलेले आहे. प्रा. मनोहर जोपळे यांचे प्रोजेक्ट गाईड म्हणून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे, नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ.नितीन जाधव व सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शरद कांबळे यांनी अभिनंदन केले.
सदर तृतीय वर्ष केमिस्ट्री या विषयाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीस प्रा.मनोहर जोपळे, डॉ.अजीत नगरकर प्रा.ऋषिकेश गोतारणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, यावेळी महाविद्यालयातील प्रा. डॉ. राजेश झनकर , प्रा. समाधान गांगुर्डे, डॉ.सुलक्षणा कोळी, डॉ.संदीप निकम, प्रा. आशुतोष खाडे, प्रा नीता पुणतांबेकर, प्रा. उत्तम सांगळे, डॉ. भागवत महाले, डॉ . दिनेश उकिर्डे, प्रा. प्रशांत रणसुरे, प्रा. संदीप गोसावी, प्रा.निलेश मरसाळे , प्रा. प्रणील जगदाळे, प्रा. संकेत भोर, प्रा. राजश्री शिंदे, प्रा.योगिनी पगारे, प्रा.ममता धनगर, प्रा. ललिता सोनावणे आदींनी अभिनंदन केले.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०