येडशीत रोजगार हमी जॉब कार्डचा बोजवारा , प्रशासकीय अधिकार्याचे दुर्लक्ष , महाराष्ट्र राज्य शासनाची फसवी योजना ..
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :नाशिक : मंगळवार : दि १२ डिसेंबर 2023
β⇔येडशी दि.११ (प्रतिनिधी :सुभान शेख):- धाराशिव तालुक्यातील अठरा हजार असलेले येडशी गाव आहे. या येडशी गावामधील स्वतः ची उपजिविका भागविणारे अनेक कामगार आहेत. या कामगारांना कोणतेही आधार नाही तर या कामगारांना ना शेती आहे . तर ना हाताला काम आहे. तर तसेच या येडशी मधील कामगारांने स्वतः ची उपजिविका भागवायचे कसे ? असा प्रश्न उपस्थित निर्माण होत आहे. व येडशी मधील ग्रामपंचायत ने मागील पंधरा वर्षां खालील कामगारांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मागणाऱ्या कुटुंबासाठी कुटुंब ओळखपत्र किंवा जॉब कार्ड कामगारांना नुकतेच नावाला दिले आहेत. परंतु , ग्रामपंचायत कडुन कामगारांना रोजगार हमी योजनेतुन हाताला काम मिळत नाही.आणि या रोजगार हमी मधुन कोणतेही लाभ मिळत नाही. या रोजगार हमी योजनाकडे मागील अनेक वर्षापासून धाराशिव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे.
राज्य शासनाने कामगारांना जॉब कार्ड देण्यासाठी ग्रामपंचायतकडे सोपविण्यात आली होते. जॉब कार्डचा पुर्णपणे बोजवारा वाजला आहे. कामगारांनी दिलेली माहिती अशी की , रोजगार हमीचे सेवक यांच्याकडुन रोजगार हमी योजनातून , शासनाकडुन मंजूर होवून आलेले कामाचे पैसे , जे कामगार निम्मे पैसे परत देईल अशा कामगारांना हाताला काम दिले जाते. अशा शासनाच्या योजनातून कामगारांनाकडून निम्मे पैसे उकळले ( जमा ) केले जातात. जे खरे कामगार आहेत त्यांना सदर योजनेचा लाभ मिळत नाही , अशा कामगारांना हाताला काम मिळत नसल्याने कामगारांवर उपसामारीची वेळ आली आहे .त्यामुळे पुर्णपणे ग्रामपंचायतकडून अन्याय होत आहे. तरी या धाराशिव पंचायत समिती अधिकारी यांनी लवकरात , लवकर दखल घेऊन या पंधरा वर्षांच्या खाली पासुन राज्य शासनाने येडशी ग्रामपंचायतकडे रोजगार हमीचे बजेट कोणाकडे दिलेअसून कामगारांना रोजगार हमीचे हाताला काम दिले आहे. किती जणांना लाभ मिळाला आहे. या विषयावर कसुन चौकशी करण्यात यावी व रोजगार हमीच्या कर्मचारीवर कसुन चौकशी करून , कारवाई करण्यात यावी. पंचायत समितीने येडशी ग्रामपंचायतकडे चौकशी करून कारवाई नाही केल्यास राज्य शासनाने रोजगार हमी योजनाचा बजेट बंद करण्यात यावा. येडशी मधील रोजगार हमी सेवकावर चौकशी करण्यात यावी.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :नाशिक : मंगळवार : दि १२ डिसेंबर 2023