β : सिन्नर( नाशिक) :⇔ सिन्नर तालुक्यातील दूध उत्पादन 20 टक्क्यांनी घटले-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : सिन्नर( नाशिक) :⇔ सिन्नर तालुक्यातील दूध उत्पादन 20 टक्क्यांनी घटले-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
सिन्नर तालुक्यातील दूध उत्पादन 20 टक्क्यांनी घटले
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.25 मार्च 2024
β⇔सिन्नर( ( नाशिक),दि25( प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्याचा अर्थ सहाय्य देणारा महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय, परंतु दुष्काळाच्या झडा आणि वाढत्या उन्हाच्या कळा यामुळे बळीराजाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. गेल्या पावसाळ्यात पावसाने सर्वच ठिकाणी पाठ फिरवल्यामुळे जनावरांचा चारा व पाणी टंचाई तसेच पशुखाद्याच्या वाढत्या किमती यामुळे शेतकऱ्यांना पशुधन पाळणे खूप अवघड झाले आहे.
दुष्काळी परिस्थितीशी झगडत दूध व्यवसाय भरभराटीला आणणारा सिन्नर तालुका, फेब्रुवारी महिन्यापासून सरासरी 20% दूध उत्पादन कमी झाले आहे. गेल्या पावसाळ्यामध्ये कमी पाऊस झाल्यामुळे शेतीतील उत्पन्नाला झड पोचली आहे. दारासमोर बांधलेल्या पशुधनास चारा देखील विकत घेण्याची वेळ बळीराजावर आली आहे. यंदाही उन्हाळा असाहाय्य असल्याचे संकेत फेब्रुवारीपासूनच दिसून येत आहेत. त्यामुळे दूध व्यवसायात आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510