आदिशक्तीचा जागर : नवरात्रोत्सव आणि स्त्रीशक्तीचा सन्मान
β : सटाणा (नाशिक ):⇔आदिशक्तीचा जागर : नवरात्रोत्सव आणि स्त्रीशक्तीचा सन्मान-(प्रतिनिधी : वसंत सोनवणे)
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 06 ऑक्टोबर 2024
β⇔ सटाणा(नाशिक ), ता.06 ( प्रतिनिधी: वसंत सोनवणे):-आज सर्वत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आदिशक्तीचा जागर सुरू आहे. देवीच्या विविध रूपांपुढे आपण श्रद्धेने नतमस्तक होत असतो, तिच्या कृपेसाठी उपासना करतो आणि निर्गुण शक्तीला आवाहन करतो. “उदे ग, अंबे उदे!” असे आवाहन करत तिच्या रूपांचे महत्त्व जाणून घेतो. आदिशक्तीच्या विविध रूपांना देवतांनीदेखील शरण जाऊन पुरुषार्थ साध्य केला, आणि आजच्या काळातही पुरुषासाठी तिची उपासना अनिवार्य आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व आहे, ज्यामुळे व्यक्ती, कुटुंब, समाज आणि गावांची जडणघडण झाली. परंतु आज, एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत असून स्वतंत्र कुटुंबपद्धती उदयाला आली आहे. या बदलामुळे वृद्धाश्रमांचा उदय झाला आहे आणि नातेसंबंधांची जपणूक हरवत चालली आहे. या परिस्थितीत समाजाच्या आदर्श परंपरांचा ऱ्हास होतो आहे. समाजामध्ये संवेदनशीलता टिकवण्यासाठी कुटुंबातील नातेसंबंध जपणे आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीने शिकवले आहे की देव प्रत्येक घरात जाऊ शकला नाही, म्हणून “आई” या रूपात तिला पाठवले आहे. नवरात्रोत्सवात या मातृशक्तीला त्रिवार वंदन करावेसे वाटते. देवाच्या सगुण रूपातील स्त्रीशक्तीची अनेक रूपे मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाची आहेत. ज्या घरात स्त्रीरूपांचा योग्य सन्मान होतो, तिथे नक्कीच आदिशक्तीचा वास असतो. मानव स्वभावाने जे ताटात आहे, त्याची चव घेण्याऐवजी जे नाही त्याच्या मागे धावतो, आणि शेवटी काय मिळते हे त्यालाच ठाऊक असते. स्त्रीच्या विविध रूपांशिवाय मानवी जीवन गतिहीन व चवहीन असते. आई, आजी, पत्नी, बहीण, मुलगी, सून, मावशी, आत्या या सर्व रूपांमध्ये ती नांदत असते. तिच्या त्याग, समर्पण, आणि बलिदानामुळे समाजाची बांधणी होते. स्वतःच्या अस्तित्वाला बाजूला ठेवून ती दुसऱ्यांच्या सुखातच आपले सुख मानते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण या नवदुर्गांचा विचार करूया. ज्या घरात स्त्रीरूपांचा योग्य सन्मान केला जातो, त्या घरावर आदिशक्तीची कृपा चंद्रसूर्यापर्यंत टिकून राहील. म्हणून, या नातेसंबंधांना जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण आदिशक्तीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करूया.
बोला, “अंबे बाईचा उदो उदो!”
वसंत सोनवणे,सटाणा
(पद.शिक्षक) जि.प.आदर्श शाळा कोटबेल β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)