“श्रमदान संस्कारातून व्यक्तीमत्त्व घडतात” : डॉ. सुनील ढिकले
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 27 जानेवारी 2024
β⇔,त्र्यंबकेश्वर , दि.27 (प्रतिनिधी:समाधान गांगुर्डे ) :- येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी संस्कार शिबिराचा समारोप काचुर्ली,( ता. त्र्यंबकेश्वर) येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनिल ढिकले हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा विद्या प्रसारक संस्थेचे नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश पिंगळे हे उपस्थित होते.
या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना डॉ.सुनिल ढिकले म्हणाले की ” शासनाला महाविद्यालयातून चांगली पिढी समाजासाठी पुढे यावी ही अपेक्षा असते. श्रम हे महत्त्वाचे असून श्रमाचे दान अनमोल आहे, त्यातून खरे संस्कार व व्यक्तिमत्त्व घडतात.विद्यार्थ्यांनी स्वावलंबी व्हावे. आपले संस्कार हे आपल्या कृतीतून समाजासमोर व्यक्त होत असतात. विद्यार्थ्यांमध्ये लोप पावत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा रुजवण्याची आवश्यकता असून शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.महाविद्यालयांमध्ये ग्रंथालय व प्रयोगशाळा या सुसज्ज असल्यास विद्यार्थ्यांमध्ये आपोआपच वाचनाची आवड निर्माण होते.” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी रमेश पिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ” शिबिरे हे संस्कारांचे केंद्र असतात. विद्यार्थी यातून श्रम संस्काराबरोबरच आपल्या स्वतःच्या व पर्यायाने समाजाच्या विकासाची संस्काराची शिदोरी आपल्या बरोबर नेत असतो. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक विकास, देशप्रेम, सामाजिक बांधिलकी व सामाजिक जाणीव निर्माण होत असते. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी श्रमसंस्कार शिबिरांची आवश्यकता आहे.” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार हे म्हणाले की ” हे शिबिर म्हणजे मूल्य, विचार व श्रमनिष्ठा यांच्या संस्काराचे कृतीकेंद्र आहे.संस्कार व स्वावलंबनासाठी अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असते.स्वयंसेवकांनी श्रमदानातून उभारलेले काम हे वाखाण्याजोगे आहे.” असे सांगत विद्यार्थ्यांनी शिबिरात केलेल्या कार्याचा त्यांनी गौरव करून यापुढे देखील अशाच कार्याची अपेक्षा व्यक्त केली. दि. 19 ते 25 जानेवारी 2024 या सात दिवशीय शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने काचुर्ली या गावांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण ,जल संवर्धन, संविधान विषयक जनजागृती, मतदार जनजागृती, आरोग्य विषयक जागृती व पर्यावरण पूरक अशा विविध उपक्रमांचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले.शिबिरामध्ये प्रणिती तपकिरे, प्रा. पंकज गांगुर्डे, दीपक देवरे , प्रा. अशोक सोनवणे , डॉ. बाळासाहेब चकोर, सरस्वती शिंदे, प्रा. शाश्वती निर्भवणे आदींच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून वाळूभाऊ काकड (संचालक ,शेतकरी संघ नासिक) व प्रभाकर पिंगळे(माजी चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी, मखमलाबाद) हे उपस्थित होते.
समारोप प्रसंगी आपल्या सात दिवसीय शिबिरामध्ये आलेल्या विविध अनुभवांचे कथन कुमारी गायत्री घुले व कु. कृष्ण भाडमुखे यांनी केले. तर शिबिरातील उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून कु. निशांत काळे तर उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून कु. रेणुका गांगुर्डे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विष्णू दिघे, प्रा. ऋषिकेश गोतरणे, डॉ. सोनाली पाटील, प्रा. ममता धनगर, शरद लोखंडे व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सकाळ सत्र प्रमुख डॉ. राजेश झनकर, प्रा.उत्तम सांगळे, प्रा.संदीप गोसावी, प्रा. प्रशांत रणसुरे, प्रा. जोंधळे मॅडम, डॉ.अजित नगरकर, प्रा. मनोहर जोपळे, प्रा.नीता पुणतांबेकर, प्रा. शास्वती निर्भवणे, प्रा. किरण शिंदे, डॉ. नयना पाटील, प्रा. प्रनिल जगदाळे, प्रा. संकेत भोर, प्रा.पाखरे इ.प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समाधान गांगुर्डे यांनी केले तर प्रा. ऋषिकेश गोतारणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो ८२०८१८०८१०