





एकविरा देवी माध्यमिक महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्कृत सप्ताहाचे औचित्य साधून संस्कृत साहित्य प्रदर्शन उत्साहात संपन्न !
β ::⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि 6 , सप्टेंबर 2023
β ⇒ धुळे , ता .५ , ( प्रतिनिधी : भागवत सोनवणे ) :- देवपूर ( धुळे ) येथील एकविरा शैक्षणिक मंडळाचे एकविरा देवी माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथे संस्कृत सप्ताहाचे औचित्य साधून संस्कृत साहित्य प्रदर्शन कार्यक्रम अध्यक्ष प्रशांत वाघ व सचिव प्रदीप वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला .या प्रदर्शनाचे उ उदघाटन मुख्याध्यापिका सौ.पी आर अहिरराव यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रदर्शनाला ज्येष्ठ शिक्षक श्री जी बी फुलपगारे,श्री एन एन पाटील,श्रीमती ए ए भदाणे यांची सुध्दा विशेष उपस्थिती होती.प्रदर्शनात इ .८ वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेतला. प्रदर्शनात दैनंदीन जीवनातील वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे संस्कृत नावासह संग्रह होता. यामध्ये स्वयंपाक घरातील वस्तू, शालेय उपयोगी वस्तू ,पशुपक्षी ,प्राणी, वाहन दागिने ,खाद्य पदार्थ,संस्कृत म्हणी यासारखे जवळ-जवळ हजार संस्कृत शब्दांचा संग्रह होता. प्रदर्शनाचे आयोजन संस्कृत शिक्षिका श्रीमती अर्चना पाटील यांनी केलेले होते. श्री पी वी दीक्षित,श्री जी बी फुलपगारे,श्रमती के के सिसोदे यांचे विशेष सहकार्य लाभले .कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू, शिक्षिका भगिनी , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते…
दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले, : मो. ८२०८१८०५१०
