β : नाशिक (शहर) :⇔ज्ञानसंपन्नता हेच ऐश्वर्य : प्रा.मिलिंद जोशी यांचे स्मृती व्याख्यानात प्रतिपादन-(प्रतिनिधी : छाया लोखंडे)
β : नाशिक (शहर) :⇔ज्ञानसंपन्नता हेच ऐश्वर्य : प्रा.मिलिंद जोशी यांचे स्मृती व्याख्यानात प्रतिपादन-(प्रतिनिधी : छाया लोखंडे)
ज्ञानसंपन्नता हेच ऐश्वर्य : प्रा. मिलिंद जोशी यांचे स्मृती व्याख्यानात प्रतिपादन
फोटो- सर डॉ . मो. स . गोसावी ह्याच्या प्रथम स्मृतीदिना निमित्ताने आयोजित ज्ञान संपन्नता हेच ऐश्वर्य ह्या स्मृती व्याख्यान मालेचे पुष्प गुंफतांना प्रा .डॉ. मिलिंद जोशी , व्यासपीठावर संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे , अध्यक्ष डॉ . आर .पी. देशपांडे . प्रेसिडेंट डॉ . सुहासिनी संत , विशेष अतिथी डॉ . अरविंद राणे ,गौतम शेठ क्षत्रिय आदि दिसत आहेत .
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि. 26 जून 2024
β⇔नाशिक (शहर), दि.26 (प्रतिनिधी : छाया लोखंडे ):- “शिक्षण अधिक जीवनस्पर्शी व्हायला हवे. कौटुंबिकता आणि कौशल्य यानेच समाज सुदृढ होतो. जीवन तणावमुक्त राहील असे शिक्षण हवे. भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञान ही एक शक्ती आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही गुणवैशिष्ट्य असतात. ज्ञानाशिवाय पवित्र अशी कोणतीही गोष्ट नाही. ज्ञान वाटल्याने ते अधिक वाढते. माणसातील आदर्श समाजासमोर आले पाहिजेत. म्हणूनच ज्ञानसंपन्नतेचे ऐश्वर्य प्रत्येकाला मिळावे असे वातावरण समाजात निर्माण व्हावे,” असे प्रतिपादन प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या व्याख्यानात केले.
स्वर्गीय ज्ञानमहर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांना ९ जुलै २०२३ रोजी देवाज्ञा झाली. ज्ञानमहर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांचे शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदान सर्वपरिचित आहे. शिक्षणासाठी सरांनी आपले सर्व आयुष्य वेचले. शिक्षणातून सामाजिक विकासाची १०६ वर्षांची देदीप्यमान परंपरा संस्थेला लाभली आहे. सरांच्या शिक्षण विषयक विचारांना व कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी तसेच संस्थेच्या बीवायके महाविद्यालयाच्या ‘भिकुसा डे’ च्या निमित्ताने सरांच्या महान कार्याच्या स्मरणार्थ स्मृती व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार, दि. २६ जुलै २०२४ रोजी संस्थेच्या गुरुदक्षिणा येथील ‘पलाश’ सभागृहात करण्यात आले होते. प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘ज्ञानसंपन्नता हेच ऐश्वर्य’ ह्या विषयावर स्मृती व्याख्यान दिले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी श्री. मिलिंद जोशी, विशेष अतिथी उद्योजक व माजी विद्यार्थी अरविंद राणे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा संस्थेच्या सचिव व खजिनदार डॉ. सौ. दीप्ती देशपांडे, देणगीदार गौतम शेठ क्षत्रिय, संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.पी. देशपांडे, चेअरमन डॉ. सुहासिनी संत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांनी स्व. महर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
स्वागतपर प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय संस्थेचे नाशिक विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी केला. एसएमआरके महिला महाविद्यालयाचे प्रा. गौरव भावसार यांनी तयार केलेल्या सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या डिजिटल तैलचित्राचे अनावरण डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांनी केले. स्व. सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या स्मरणार्थ माजी विद्यार्थ्यांनी शब्दबद्ध केलेला लेखसंग्रह ‘आधारवड’ या विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अरविंद राणे यांनी आपल्या मनोगतात सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या शैक्षणिक काळातील अनुभव कथन केले आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. “सरांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव माझ्यावर पडला असून मी माझ्या आयुष्यात यश संपादन करू शकलो,” असे त्यांनी आपल्या भावनांमध्ये व्यक्त केले. ‘शब्दमल्हार’ प्रकाशन संस्थेचे श्री. स्वानंद बेदरकर यांनी सन्मानपत्राचे वाचन करून एमबीएच्या माजी विद्यार्थ्यांनी गोसावी सरांना दिलेला मरणोत्तर सन्मानपत्राचा संस्थेचे अध्यक्ष आर.पी. देशपांडे यांनी स्वीकार केला.
स्व. गोसावी सरांचे माजी विद्यार्थी व गोगटे इलेक्ट्रोसिस्टीमचे सीईओ, कुशल उद्योजक म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. विवेक गोगटे यांनी आपले प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना सरांच्या आठवणींना उजाळा दिला. “शिक्षण क्षेत्रातील आदर्श म्हणजे सर डॉ. मो. स. गोसावी होय,” असे त्यांनी सांगितले. बीवायके महाविद्यालयाच्या ‘भिकुसा डे’ निमित्त बी.वाय.के. प्रायव्हेट लि. तर्फे शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार डॉ. दीप्ती देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला. बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गंगाधर कायंदे पाटील, बेस्ट स्टाफ प्रा. प्रविण मुळे, सौ. अनिता बाग आणि बेस्ट स्टुडंट अनिषा अमीन व आर्या गोसावी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ह्या प्रसंगी शिवपार्वती प्रतिष्ठानतर्फ बी वायके महाविद्यालयाला दोन लाख रू देणगी देण्यात आली. तसेच यशवी विद्यार्थ्याना गौरविण्यात आले .