आदिवासी बांधवांनी भातशेतीसह जाेड पीक घ्यावे : विशाल नरवाडे
कळवण प्रकल्प अधिकारी नरवाडे यांनी घेतला काेठुळा येथे भात लागवडीचा आनंद : शासन आपल्या दारी
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : बोरगाव – प्रतिनिधी : लक्ष्मन बागुल
β⇒ बोरगाव (ता. सुरगाणा), ता.२४ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासारखाच महसूल अधिकारी थेट शेतात हा उपक्रम कळवणचे प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांनी राबवण्यास सुरूवात केली आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी सुरगाणा तालुक्यातील काेठुळा गावास भेट देत भात लागवडीतील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले .यावेळी भात शेती लागवडीचा आनंद घेतला.
सुरगाणा तालुक्यात अजूनही पारंपारिक भात पिकाचीच जादा लागवड हाेते. यातून शेतकऱ्यांना उत्पन्नही कमी मिळते. यासाठी भाताच्या अत्याधुनिक वाणाची निवड करणे, याेग्य प्रकारे लागवड करणे, बीज प्रक्रीया, याेग्य वेळी याेग्य रासायनिक खतांची मात्रा देणे याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. भातासाठी राब भाजणीपासून लागवठीपर्यंतची प्रकीया समजावून घेत यात काही ठिकाणी बदल करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे, मंडळ कृषी अधिकारी अनिल भाेर, कृषी पर्यवेक्षक विलास भाेळे, यांच्यासह कृषी सहाय्यक मधुकर कुवर, सहादू भाेये, श्रीहरी गावित, विनायक कुवर यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली . त्यानंतर शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्वरीत साेडविण्याचे आवाहन केले. आदिवासी शेकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावता येईल याबाबत याेग्य त्या सूचना करण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांना केले. यासह जाेड पीक कोणते घेता येईल याबाबतही आदिवासी शेतकऱ्यांशी चर्चा केली.
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो .८२०८१८०५१०