





नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 23 ऑगस्ट 2024
β⇔नाशिकरोड, दि.23 (प्रतिनिधी : संजय परमसागर ):- नाशिकरोड :- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या वादाचे पर्यावसन वाद मिटवण्यासाठी प्रयत्नात असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्य,कर्मचारी शिक्षक व विद्यार्थी यांच्यावर हल्ला होण्यात झाले. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ आज शुक्रवारी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या वतीने निषेध सभा आयोजित करण्यात आली.
याप्रसंगी गोखले एज्युकेशन सोसायटीचे शाखा सचिव प्राचार्य डॉ.व्ही.एन. सूर्यवंशी,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य सागर वैद्य, डॉ. प्रणव रत्नपारखी, प्राचार्या. डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे, डॉ. के. सी. टकले यासह प्राध्यापक शिक्षकांनी तीव्र शब्दात घटनेचा निषेध केला. सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर निषेध व्यक्त करून गुन्हेगारावर कडक कारवाई व्हावी अशा तीव्र भावना व्यक्त केली.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )