





कर्मवीर अॅड. बाबुराव गणपतराव ठाकरे (केबीटी) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांची इमर्सन एक्स्पोर्ट इंजिनीअरिंग कंपनीत निवड

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि. 6 जून 2024
β⇔नाशिक, दि.6 (प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):- मविप्र संस्थेच्या कर्मवीर अॅड. बाबुराव गणपतराव ठाकरे (केबीटी) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नऊ विद्यार्थ्यांची इमर्सन एक्स्पोर्ट इंजिनीअरिंग कंपनीत निवड झाली आहे. इमर्सन एक्सपोर्ट इंजिनीअरिंग सेंटर, नाशिक यांनी आयोजित केलेल्या कॅम्पस ड्राइव्हमध्ये या विद्यार्थ्यांनी प्रारंभिक स्क्रीनिंग, तांत्रिक आणि एचआर मुलाखत यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
सदर कॅम्पस ड्राइव्हमध्ये इन्स्टूमेनटेशन आणि कंट्रोल विभागातील भावना मोरे, नेहा सराफ, ऋतुजा दोशिंग, रेवती पाटील, पवित्रा नायर, अक्षदा थानकर, श्रेयस येलमामे, आकाश बोडके, गौरव निकम नऊ विद्यार्थ्यांना ५.३१ लाखांचे वार्षिक केज मिळणार आहे.
संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे, प्राचार्य डॉ. सतीश आर. देवणे, उपप्राचार्य डॉ. व्ही. एम. बिरारी, इन्स्टूमेनटेशनचे विभागप्रमुख डॉ. बी. जे. पर्वत, कुलसचिव सृष्टी शिंदे, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी महेश आडके आणि मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सर्व व्यवस्थापनानेही निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल कौतुक केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)