आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
β⇒ निफाड : सायखेडा विद्यालयात तृणधान्य जनजागृती अभियान… ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )
सायखेडा विद्यालयात तृणधान्य जनजागृती अभियान...
0
1
2
2
9
4
“सायखेडा विद्यालयात तृणधान्य जनजागृती अभियान ! “…
β⇒ दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : सायखेडा प्रतिनिधी : राजेंद्र कदम
β⇒ सायखेडा ( निफाड ), ता . ८ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 साजरे केले जात असून त्याचा भाग म्हणून जनता इंग्लिश स्कूलमध्ये निफाड येथील सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती शीतल गांगुर्डे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
त्या म्हणाल्या की दररोजच्या आहारात ज्वारी बाजरी राळा नागली यासारख्या तृणधान्याचा समावेश केला तर आपण निरोगी राहतो. कर्करोगासारख्या भयानक आजारावर मात करू शकतो. निरोगी राहणे ही आजच्या काळाची गरज आहे. या कार्यक्रमास शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष विजय कारे , अभिनव स्कूल कमिटीचे अध्यक्ष जगन्नाथ डेरले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गावले, पालक संघाचे उपाध्यक्ष श्याम सोनवणे , प्राचार्य नवनाथ निकम, पर्यवेक्षक दौलत शिंदे उपस्थित होते .
यावेळी कृषी सहाय्यक अधिकारी शितल गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना तृणधान्य विषयक प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय पोषण आहार प्रमुख श्री ज्ञानेश्वर करपे यांनी केले. सूत्रसंचालन अवधूत आवारे यांनी केले, तर आभार अशोक डेरले यांनी मानले कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले , मो . 8208180510
0
1
2
2
9
4