β : नाशिक :⇔ गरब्याच्या रंगात… रंगले… एस. एम.आर. के.महिला महाविद्यालय नाशिक -(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी)
β : नाशिक :⇔ गरब्याच्या रंगात... रंगले... एस. एम.आर. के.महिला महाविद्यालय नाशिक -(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी)
गरब्याच्या रंगात… रंगले… एस. एम.आर. के.महिला महाविद्यालय नाशिक
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 23 जानेवारी 2024
β⇔,नाशिक,दि.23(प्रतिनिधी:छाया लोखंडे-गिरी):- येथील एस. एम.आर. के. महिला महाविद्यालयात स्नेहसंमेलना निमित्त माजी विद्यार्थीनी संघटनेच्या वतीने गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोखले शिक्षण संस्थेच्या सचिव व खजिनदार डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्या प्रमुख पाहुणे उपस्थित होत्या .
सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध शाखांमधील विद्यार्थीनींनी यात सहभाग नोंदविला. यात उत्कृष्ट समुह नृत्य- एकता सुहानी यांच्या ग्रुपला तर, उत्कृष्ट जोडी- श्रुती जाधव, तनुजा जगताप, उत्कृष्ट पेहराव- ज्योती श्रीराम पंडित, तर बेस्ट सोलो झीनपरी श्रीवास यांना प्राप्त झाले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . सौ . कविता पाटील ह्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थीनींना गौरविण्यात आले. या स्पधेसाठी परीक्षक प्रांजली मालपाणी व प्रा. प्रज्ञा अभ्यंकर ह्यांनी काम पाहिले प्रा. सायली आचार्य व प्रा वैशाली चौधरी यांनी स्पर्धचे नियोजन उत्कृष्ट रित्या केले. ह्या स्पर्धचे प्रायोजकत्व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या देशपांडे कुलकर्णी , अधिक्षिका प्रा.सुरेखा जोगी यांनी स्वीकारले होते .
या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ कविता पाटील उपप्राचार्या डॉ. निलम बोकील, उपप्राचार्य डॉ. नितीन सोनगीरकर डॉ. विवेक खरे, प्रा. संजय पाबारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. माजी विद्यार्थिनी संघटनेच्या प्रमुख सीमा पेटकर ह्यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. सायली आचार्य यांनी आभार मानले. आज वेशभूषा स्पर्धा, रील मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो ८२०८१८०८१०