बिटको महाविद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त व्याख्यान व योगासन
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 21 जून 2024
β⇔नाशिकरोड, दि.21 (प्रतिनिधी : संजय परमसागर):-“स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक सकारात्मक ऊर्जेसाठी, निरामय स्वास्थ्य व आरोग्यासाठी योगसाधना आवश्यक आहे. योगासने, प्राणायाम यांमुळे शरीर लवचिक होऊन हाडांना, स्नायूंना बळकटी येते तसेच शरीरावरील ताण तणाव कमी होण्यास मदत होते.” असे मार्गदर्शन करताना योग विद्याधाम नाशिकचे संजय जोशी यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात एन. सी. सी.आर्मी व एअर विंग, एन. एस. एस., कमवा आणि शिका, क्रीडा, विद्यार्थी कल्याण मंडळ विभाग वतीने आयोजित दि.२१ जुन रोजी जागतिक योगदिना निमित्त महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या व्याख्यान व योग प्रात्यक्षिक प्रसंगी ते बोलत होते. व्यायाम आणि योगसाधना मधील फरक सांगून विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर झाली.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यासह उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे व डॉ.आकाश ठाकूर , एनसीसीचे डॉ. विजय सुकटे, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.विशाल माने व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार, डॉ.कांचन सनानसे, क्रीडाशिक्षक डॉ. धनंजय बर्वे, महेश थेटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कांचन सनानसे यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी, “योगसाधना ध्यानधारणा आणि आयुर्वेद ही आपल्या देशाची परंपरा असून रोज घरच्या घरी किमान एक तास सूर्यनमस्कार, योगाभ्यास केल्यास त्याचे अनेक फायदे व सकारात्मक परिणामांची अनुभूती मिळते, “असे सांगितले.याप्रसंगी कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.स्नेहा देशमुख हिने केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)