येडशी परिसरात रब्बी हंगाम धोक्यात , हरभरा पिकावर अळ्याचा प्रादुर्भावाने शेतकरी संकटात,नुकसान भरपाईची मागणी
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि.7 डिसेंबर 2023
β⇔ येडशी( धाराशिव ), ता 7 : ( प्रतिनिधी : सुभान शेख ) :- धाराशिव तालुक्यातील येडशी गावातील शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील हरभरा पिक पाने ,खोड खाणाऱ्या अळ्याच्या प्रादुर्भावाने संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून कर्ज काढून बी – बियाणे ,खते घेवून पेरणी केली होती. मात्र आता हरभरा पिकावर पाने , खोड खाणाऱ्या अळ्याच्या प्रादुर्भावाने काही शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा पिक वाया गेले आहे. सध्या काही भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा पिक धोक्यात आलेले असून शेतात काही भागात हरभरा उगवला तर ठिक – ठिकाणी हरभरा उगवला नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्याचबरोबर धाराशिव तालुक्यातील येडशी परिसरात अवकाळी पावसामुळे संपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा पिकावर अळ्याचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि रब्बी हंगामावर किडीचा प्रादुर्भाव या दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.
रब्बी हंगामात काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून हरभरा पिकाची पेरणी केली आहे. जर या शेतकऱ्यांचे हरभरा पिक अळ्यानी खाल्ले तर शेतकऱ्यांचे कर्ज घेतलेले फेडायचे कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस होवून अतिवृष्टी झाल्यामुळे, शेतकऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. धाराशिव तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार कोण ? असे वेगवेगळे प्रश्न शेतकरी बांधवाना पडला आहे. सध्या राजकारणी निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार कोण असा पश्न उपस्थित होत आहे. तरी राज्य शासनाने शेतकऱ्यांचे समस्या सोडवण्यासाठी ताबडतोब दखल घ्यावी आणि शासनाने रब्बी हंगामातील सर्व पिकांची पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
©येडशी : प्रतिनिधी :⇒ सुभान शेख, मो.९८३४५१६३१३
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०