आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
β : त्र्यंबकेश्वर :⇔”लोकशाही बळकट करण्यासाठी कायदा व्यवस्था संविधानाने सक्षम असणे आवश्यक आहे” त्र्यंबकेश्र्वर तहसीलदार – श्रीमती श्वेता संचेती-( प्रतिनिधी : शाश्वत महाले )
β : त्र्यंबकेश्वर :⇔''लोकशाही बळकट करण्यासाठी कायदा व्यवस्था संविधानाने सक्षम असणे आवश्यक आहे" त्र्यंबकेश्र्वर तहसीलदार - श्रीमती श्वेता संचेती-( प्रतिनिधी : शाश्वत महाले )
0
1
2
2
9
2
”लोकशाही बळकट करण्यासाठी कायदा व्यवस्था संविधानाने सक्षम असणे आवश्यक आहे” त्र्यंबकेश्र्वर तहसीलदार – श्रीमती श्वेता संचेती
”त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय संविधान दिन उत्साहात साजरा “
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार, दि.1 डिसेंबर 2023
β⇔ त्र्यंबकेश्वर, ता.30 ( प्रतिनिधी : शाश्वत महाले ) :- भारतीय राज्यघटना ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील समाजवादी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधानाचं पालन चौकटीत राहून करणं गरजेचं आहे, म्हणून आजच्या तरुण विद्यार्थ्यांनी कायद्याचा अभ्यास करून संविधानात्मक नियमांची जाणीव -जागृती समाजात करण्याची जबाबदारी आज तरुणांवर आहे . असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्रीमती श्वेता संचेती यांनी केले.
त्या येथील मविप्र कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्रंबकेश्वर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राज्यशास्त्र विभाग , राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ विभागांतर्गत राष्ट्रीय संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. पुढें बोलताना असे म्हणाल्या की, आज राजकीय क्षेत्रामध्ये तरुण पिढीची नितांत गरज निर्माण झाली आहे, देशाच्या प्रगतीसाठी युवा पिढीने नेतृत्व करणे काळाची गरज आहे म्हणून संविधानाचं पालन करून त्याची जाणीव जागृती करण्याची जबाबदारी तरुणावर आलेली आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नाव येण्यासाठी फॉर्म नंबर सहा भरून मतदान कार्ड प्राप्त करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे, तरच मतदानाची टक्केवारी वाढेल आणि योग्य शासन निर्माण करू शकणार आहात असे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पवार अध्यक्षस्थानी होते , प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार त्र्यंबकेश्वर ठकाजीं महाले, राष्ट्रीय निवडणूक साक्षरता अभियान नवीन मतदार समन्वयक नाशिक जिल्हा श्री अविनाश शिरसाट त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे राष्ट्रीय मतदार जागृती मतदार नोंदणी अभियानाचे नोडल ऑफिसर डॉ. भागवत महाले, महाविद्यालयीन नव मतदार अभियानाचे समन्वयक डॉ. सोनाली पाटील, डॉ.वैशाली जाधव, प्रा . राजश्री शिंदे , विद्यार्थी प्रतिनिधी विनोद मगर आदीसह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते
.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनीं कायद्याचे ज्ञान आत्मसात करून समाजासाठी नेतृत्व करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थी समजून नागरिकांमध्ये जाणीव- जागृती मोहिम राबवली पाहिजे. एक आदर्श नागरिक म्हणून आपलं हक्काची जाणीव बरोबरच कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणून 2015 पासून भारत सरकार व निवडणूक निवडणूक आयोग यांच्या अंतर्गत 2015 पासून राष्ट्रीय संविधान दिन साजरा करण्यात येतो असे सांगितले, त्यांनी सर्व विद्यार्थ्याना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर नाशिक जिल्हा राष्ट्रीय निवडणूक साक्षरता अभियान नवीन मतदार नोंदणी अभियान समन्वयक अविनाश शिरसाट मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारतीय राज्यघटना ही जगात सर्वात मोठी लिखित स्वरूपात आहे , म्हणून तीचे रक्षण करणे आणि पालन करणे नागरिक म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे.त्यांनी संविधान बद्दल मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार ठकाजी महाले यांनी मतदार नोंदणी फॉर्म कसा भरायचा आहे, त्याचे मार्गदर्शन केले. सदर संविधान दिनानिमित्त दिनांक 24 ते 30 नोव्हेंबर दरम्यान मतदार फॉर्म मार्गदर्शन, संविधान ऑनलाईन प्रश्नावली, निबंध स्पर्धा नवीन मतदार नोंदणी असे विविध उपक्रम सप्ताहात राबिण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ भागवत महाले यांनी करत पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्याना नवीन मतदार नोंदणी अभियान अंतर्गत फॉर्म नं ६ चे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ शरद कांबळे, प्रा.नीता पुणतांबेकर, प्रा समाधान गांगुर्डे, डॉ.संदीप माळी, प्रा प्रशांत रणसुरे, प्रा संदीप गोसावी, प्रा. शाश्वती निरभवणे, प्रा.ऋषिकेश गोतरणे, डॉ वर्षा जुन्नरे, डॉ. वैशाली जाधव , अशित्तोष खाडे , प्रा मनोहर जोपळे, विद्या जाधव, नीलेश म्हरसाळे, आदीसह बहुसंख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.सूत्रसचालन डॉ सोनाली पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ भागवत महाले यांनी केले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
0
1
2
2
9
2