नाशिकात तीन महिला सहाय्यक आयुक्त रुजू होणार

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 5 जुलै 2024
β⇔नाशिक,दि.5 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- नाशिक – महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदलाचे सत्र सुरू असून , 68 उपविभागीय तथा सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात नाशिक शहर आयुक्तालयातील दोन सहाय्यक आयुक्त तर ग्रामीण मधील एका उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची बदली झाली आहे. तर नाशिक मध्ये तीन महिला सहाय्यक आयुक्त रुजू होणार आहेत.
शासनाचे अप्पर सचिव संदीप ढाकणे यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील उपविभागीय तथा सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील 379 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या तर आज 68 सहाय्यक पोलीस आयुक्त तथा पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेले आहेत. त्या बदल्यांमध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांची अमरावती ग्रामीणमध्ये अंजनगाव उपविभागीय अधिकारी, तर तसेच नाशिक ग्रामीण दलातील पेठ च्या उपविभागीय अधिकारी कविता फडतरे यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी मध्ये बदली करण्यात आली आहे. याशिवाय लातूर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी यांची नाशिकच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती मुंबई,नागरी हक्क संरक्षण चे उपाध्यक्ष सुनील घुगे व अमरावती ग्रामीणचे दर्यापूरचे उपाध्यक्ष गुरुनाथ नायडू यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमी तर संजय कांबळे यांची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीतून साक्री (धुळे) उपविभागीय अधिकारी पदी नियुक्त करण्यात आली आहे.मुख्यालयाचे सहाय्यक आयुक्त अंबादास भुसारे यांची हिंगोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)