





औषध निर्माणशास्र महाविद्यालयाचे “कलावेध 2K24” वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 20 फेब्रुवारी 2024
β⇔ नाशिक(पंचवटी), दि.20 (प्रतिनिधी : राकेश खैरनार):- श्री. पंचवटी एज्युकेशन सोसायटी संचालित, श्रीमती नर्मदाबेन पोपटलाल ठक्कर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पंचवटी या प्रांगनात “कलावेध 2K24” वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच औषध निर्माणशास्र महाविद्यालयातील पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यानी मोठ्या जल्लोषात साजरा केला.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष नरेंद्रभाई ठक्कर यांचे मार्गदर्शन लाभले , कार्यक्रमास उपस्थित संस्थेचे सचिव देवेंद्र पटेल, फार्मसी विभागाचे सचिव उपेंन्द्रभाई दिनानी,राजेशभाई ठक्कर व संस्थेचे इतर मान्यवर पदाधिकारी यांनी सरस्वती पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल गुलेचा व सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कलावेध 2K24 हा कार्यक्रम अविस्मरणीय होणे करिता जीवापाड मेहनत घेतली. या वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलनात विद्यार्थीनी अनेक बॉलीवूड कलाकारांचे अभिनय सादर करून प्रेक्षकांचे मन वेधुन घेतले. शिवरायांच्या मावळ्यांची, राम सेनेची, मनी हायस्ट, मिसमैच वेशाख परिधान केलेले अश्या विविध प्रसंगाचे कौशल्य प्रस्तुति दर्शविन्याचे काम आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी केले.उत्कृष्ट प्रसारण करणाऱ्या विद्यार्थ्याना बहुमोल पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच निबंध, रांगोळी, पोस्टर सादरिकरण यासारंख्या स्पर्धा मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिके देण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह दिसुन आला . कार्यक्रमात उपस्थित असलेले संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व इतर समुदाय यांच्या उत्साहातील आठवणी देखील कायमस्वरूपी स्मरनात राहतील, अशी प्रतिमा महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी दाखवून संस्थेच्या नावलौकिकात भर वाढवली.
कार्यक्रमाचे संपूर्ण सादरीकरण बघुन उत्कृष्ट कला करणाऱ्या पदवी तिसऱ्या वर्षातील ओम काळे व साक्षी पाटील यांनी शंकर भगवान व पार्वती यांचे वेश परिधान करून भस्म लावलेले नृत्य दाखवून फार्मसी विभागाचे सचिव उपेन्द्रभाई दिनानी यांचे लक्ष केंद्रित करुण घेतले. सदरिल नृत्य दर्शविणाऱ्या विद्यार्थ्याना त्यांनी त्यांच्या N&J Dinani Charitable Trust कडून रुपये 5000/- इतके रोकड़ पारितोषिक जाहिर केले तसेच पदविका प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यानी बॉलीवुड गाण्यातील शब्दप्रयोग नृत्य करून विशेष कला दाखवून प्रेक्षकांना हस्यास प्रवृत्त केले. त्या गटाला देखील N & J Dinani Charitable Trust कडून रुपये 2500/- इतके रोकड़ पारितोषिक देऊन त्यांना पुढील वाटचालिस प्रेरणा दीली.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. 8208180510