β : त्र्यंबकेश्वर :⇔त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात भूगोल दिन साजरा – (प्रतिनिधी: समाधान गांगुर्डे )
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 20 जानेवारी 2024
β⇔,त्र्यंबकेश्वर , दि.20 (प्रतिनिधी: समाधान गांगुर्डे ) :- येथीलकला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे भूगोल दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कृषी अधिकारी गणेश बांभळे तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. एकनाथ करंजखेले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार होते. प्रत्येक दिवस साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू असतात, म्हणूनच असे उपक्रम महाविद्यालयामध्ये सातत्याने राबवले जावेत असे वक्तव्य प्रमुख अतिथी गणेश बांभळे यांनी केले. त्यानंतर बोलतांना प्रा. एकनाथ करंजखेले यांनी भूगोलातील आद्रता, तापमान, रेखांश, अक्षांश, मैल या संकल्पना स्पष्ट केल्या. स्वतःची ओळख स्वतः निर्माण करा. नाव कमावतांना कोणाचाही आधार घेऊन नका असे वक्तव्य त्यांनी केले.
β : त्र्यंबकेश्वर :⇔त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात भूगोल दिन साजरा – (प्रतिनिधी: समाधान गांगुर्डे )
अध्यक्षीय भाषणात डॉ. दिलीप पवार बोलतांना म्हणाले की, पुढील काळ आंतरविद्याशाखीय अभ्यास करण्याचा आहे. यामध्ये पर्यावरण आणि मानव यांचा सहसंबंध आहे कसा आहे ? प्रत्येक क्षेत्रात संधी शोधणे आणि संधीच सोनं करणे गरजेचे आहे. म्हणून संशोधन करताना प्रश्न पडले पाहिजेत आणि त्याचे उत्तर शोधली पाहिजेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. भूगोल दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या आणि विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. संदीप निकम, प्रा. निता पुणतांबेकर, प्रा.शाश्वती निर्भवणे, प्रा.ललिता सोनवणे, प्रा. मोनाली मोगल, प्रा. निलेश म्हरसाळे, प्रा.ऋषिकेश गोतरणे, प्रा. ममता धनगर, डॉ. सोनाली पाटील, डॉ. नयना पाटील यांच्यासह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनीषा पाटील यांनी केले. आभार प्रा. के. डी. पारखे यांनी मानले, तर सूत्रसंचालन उत्तम सांगळे यांनी केले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:मो ८२०८१८०८१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)