Breaking
ब्रेकिंग

β:सुरगाणा ⇔ 117-कळवण – सुरगाणा विधानसभा मतदारसंघ निवडणूक 2024

जाहीरनामा अपक्ष उमेदवार | ( प्रा. डॉ.भागवत शंकर महाले (असोसिएट प्रोफेसर)

018491

(विधानसभेत जनेतचा आवाज उठवणार मुद्दे)
👇👇

1) कळवण – सुरगाणा मतदार संघातील पिण्याच्या पाणीटंचाई प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न (जलसिंचन- सिमेंट बंधारे, तलव, छोटे धरणे बांधून ) कायमस्वरूपी शासनस्तरावरून सोडविणार आहे.

2) सुरगाणा तालुक्यातील 75 टक्के बेरोजगार स्थलांतर थांबवण्यासाठी नवीन लघुउद्योग, शेतीसाठी पाणी योजना, प्रयत्न करणार आहे.

3) 12 बलुतेदार समाजातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे.

4) आदिवासी समाजातील युवकांसाठी पेसा भरती कायमस्वरूपी लागू करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे.

5) 100 एकर गट गावठाण जागेसाठी सुरगाणा शहरालगतच्या जागी प्रश्न शासन दरबारी प्रयत्न करणार आहे.

6) सुरगाणा तालुक्याला एसटी डेपो साठी प्रयत्न करणार आहे आणि मतदार संघातील सर्व बस स्थानक आधुनिक सुविधा मिळवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे.

7) आदिवासी समाजातील उच्च शिक्षित तरुणांसाठी उद्योग योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

8) कळवण -सुरगाणा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी शेतीला हमीभाव मिळण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न आहे.

9) एक नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ओ पी एस तत्काळ लागू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

10) सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व खाजगीकरण त्वरित थांबवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे.

11) आधुनिक प्राथमिक शिक्षण, आधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र हे अत्यावश्यक सेवा म्हणून प्रत्येक गावात विशेष दर्जा सोयी-सुविधा देण्यासाठी विधिमंडळात खास कायदा करून घेणार आहे.

12) शिक्षकांना सन्मान, चांगले वेतन, आरोग्य सेवा मोफत, प्रमोशन , कौटुंबिक पेन्शन, विमा, विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळवून देणारा कायदा करणार आहे.

13 ) प्राथमिक शिक्षण ते डॉक्टर, इंजिनिअर (अभियंता) वकील उच्च पदवी व पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचे शिक्षण शासकीय महाविद्यालयात मेरिटनुसार यूपीएससी /एमपीएससी धर्तीवर सर्वांना मोफत करुन शासन दरबारी कायदा करण्यासाठीं प्रयत्न करणार आहे.

14) सर्वसामान्य जनतेला गॅस 250 रुपये, पेट्रोल 50 रुपये लिटर, डिझेल 40 रूपये, आरोग्य सेवा – 50 रूपये, शिक्षण प्रवेश फी फक्त 100 रुपये, हे इन्कम टॅक्स रक्कमेवर खास तरतूद करणार आहे.

15 ) घरगुती विज 500 युनिट, शेतकरी 1000 युनिट पर्यंत मोफत वीज देणार आहे , तर त्यावरील युनिटला प्रत्येकी 05 रुपये प्रमाणे बील आकारणार ते एक महिना 30 चे बील असेल.

16) कळवण – सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील जनतेला रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

17) यूपीएससी, एमपीएससी ते शिक्षक , बँक ,रेल्वे, नोकर भरती प्रक्रिया ही एकदाच 100 ‘फी ‘ वर रजिस्ट्रेशन केल्यावर शासन दरबारी पारदर्शक, सुरक्षित, निःपक्षपणे, राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

18) जिल्हाधिकारी , तहसील, पोलीस कार्यालय, जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालय भ्रष्ट्राचार मुक्त शासकीय योजनांचा फायदा, लाभ जनतेला करून देण्यासाठी योजनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

19) कळवण – सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी क्रीडा विद्यालयाची स्थापना स्वतंत्र करण्यात यावी म्हणून प्रयत्न करणार आहे.

20) कळवण- सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी प्रत्येक गावात दळणवळणाठी रस्ते डांबरीकरण, 24 तास वीज व पाणी पुरवठा , नळ पाणीपुरवठा योजना उपलब्ध करून देणार आहे.

21) मतदार संघातील वन जमिनीचे प्रश्न मार्गी लावून स्वतंत्र सातबारा मालकाला ऊपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे.

22) मतदार संघातील सर्व ग्रामपंचायत मध्ये लघु उद्योजकांना त्यांना देऊन गावात रोजगार निर्मिती करण्यावर भर देणार आहे.

23) प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजना, निराधार व वृद्धपकाळ योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करून वाढीव पेन्शन निधी देण्याचा प्रयत्न करणार आहे.

24) महिला बचत गट व पुरुष बचत गट या गटांना शासनाच्या विविध योजना, कर्ज उपलब्ध करून देवुन उद्योग मिळवून देणार आहे.

25) मतदार संघातील सर्व व्यापारी , उद्योजक व लघु उद्योजक यांच्या समस्या सोडवून व्यवसाय वाढीसाठी शासनाच्या विविध योजना,कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

26) मतदारसंघातील प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक , प्राध्यापक, कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी , लिपिक, बांधकाम कर्मचारी , विद्युत कर्मचारी, पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, एस टी, कर्माचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशा सेविका, शिपाई, या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवणार आहे.

27) कळवण- सुरगाणा मतदारसंघातील तीर्थक्षेत्रे, मंदिरे, सुशोभीकरण करून आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

28) कळवण- सुरगाणा मतदारसंघातील नागरिकांना आधार कार्ड पॅन कार्ड, रेशन कार्ड, अंत्योदय रेशन कार्ड, मतदार कार्ड , आयुष्मान कार्ड, बस सुविधा कार्ड आदी सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

29) मतदारसंघातील आठवडे बाजार भरत असलेल्या गावांना बाजारपेठेत बाजार ओटे तयार करून वीज, पाणी, नळ पाणीपुरवठा उपलब्ध देणार आहे.

30) कळवण- सुरगाणा मतदारसंघात आदिवासी भागातील जनतेच्या सुरक्षेसाठी जंगली हिंस्र प्राण्यांपासून रक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न आहे.

**********
प्रा. डॉ. भागवत शंकर महाले , ( सहयोगी प्राध्यापक )
(एम.ए.,डी.एड.,नेट,पीएच.डी.)
1) उपाध्यक्ष – राष्ट्रीय विश्वगामी प्राध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य,
2) संघटक – आधार मैत्री फाउंडेशन नाशिक.
3) उपाध्यक्ष – स्पुक्टो प्राध्यापक संघटना,त्र्यंबकेश्र्वर महाविद्यालय, नाशिक.
मो. नंबर. 8208180510/9423070806
*********

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!