β : येडशी :⇔येडशीत विद्युत महावितरणचा भोंगळ कारभार;नागरिकांच्या जीवाशी खेळ,वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष-(प्रतिनिधी : सुभान शेख)
β : येडशी :⇔येडशीत विद्युत महावितरणचा भोंगळ कारभार;नागरिकांच्या जीवाशी खेळ,वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष-(प्रतिनिधी : सुभान शेख)
येडशीत विद्युत महावितरणचा भोंगळ कारभार; नागरिकांच्या जीवाशी खेळ, वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि, 4 जुलै 2024
β⇔येडशी ,दि.4 (प्रतिनिधी : सुभान शेख ):- येडशी येथील नागरिकांचे विद्युत महावितरणच्या डिपीचे केबल (वायर )जळुन खाक झाली असल्याने नागरिकांचे जीवन धोक्यात आलेले आहे. सदर केबलला वायरमन गाठी बांधुन (केबल )वायरची चुंबळ करत डिपीला वीज जोडणी तात्पुरती केली आहे. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून येडशी येथे “लातुर – बार्शीरोड” लगत असलेले 9 नंबर डिपीवरुन वेगळे वीज जोडणी ( कनेक्शन )बलवंड गल्लीतील अंगणवाडी डिपीवरुन बलवंड गल्ली, देशमुख गल्ली, नलावडे गल्ली या गल्लीतील नागरिकांना वीज जोडणी करून दिलेली आहे. मात्र या अंगणवाडी डिपीचे मागील अनेक दिवसांपासून केबल जळाली आहे. त्यामुळे डीपी खराब झाली आहे. सदर केबल जळुन खराब झालेली असल्याने केबलला वायरमन गाठी बांधुन केबल (वायर )ची चुंबळ करून डिपीला वीज जोडणी तात्पुरती करत वीज व्यवस्था केली जाते. परंतु या केबल वीज जोडणीची एकही दिवस वीज टिकत नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
दरम्यान अंगणवाडी डीपीला नवीन केबल किट इतर साहित्याचे मागणी करत नेहमी जोडून द्यावे लागते. परंतु विद्युत महामंडळ कर्मचारी वायरमन, महावितरणचे सहाय्यक अभियंता, तेरचे सहाय्यक उप अभियंता हे अंगणवाडी डिपीकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही. येडशी मधील नागरिकांनी वारंवार वायरमनकडे तक्रार करून देखील वायरमनकडून दखल घेतली जात नाही तर उलट नागरिकांना अरेरावीची भाषा वापरली जात आहे. विद्युत महामंडळ अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून सर्वसामान्य नागरिकांनावर अन्याय होत आहे. येडशी येथील विद्युत महावितरणाकडे पाच वायरमन असून एकाही वायरमनला डिपीवर चढून डीपीचे दुरुस्ठीचे काम करता येत नाही. त्यामुळे ज्या वायरमनला डिपीवर चढून काम करता येत नाही. अशा वायरमनला नोकरी दिली कशाला ? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.?
सदर विद्युत डिपीचे केबल (वायर) नवीन टाकण्यात यावी आणि वीज पुरवठा सुरळीत त्वरित करण्यात यावा अशी ग्रामस्थांनी केली आहे. विद्युत महावितरणचे वरीष्ठ अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून जे वायरमनच कामाची टाळाटाळ करत नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी आणि होतकरू जबाबदार कर्मचारी येथे नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी येडशी ग्रामस्थांनी केली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)