





गोखले शिक्षण संस्थेचे कार्य सामाजिक मूल्य जोपासणारे – सचिव- डॉ. सौ. दीप्ती देशपांडे

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :शनिवार :दि.6 जानेवारी 2024
β⇔नाशिक, ता. 6 ( प्रतिनिधी : छाया लोखंडे ) :-गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ‘गुरुदक्षिणा’ सभागृहात आज दि. ६ जानेवारी २०२४ रोजी संस्थेच्या सचिव व खजिनदार प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांना संस्थेतर्फे गौरविण्यात आले. त्यांची सचिवपदी एकमताने निवड झाल्याबद्दल हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. पी . देशपांडे, उपाध्यक्षा डॉ. सुहासिनी संत, नाशिक विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी, स्टाफ ट्रेनिंग ॲकेडमीच्या प्रमुख डॉ. अंजली कुलकर्णी, प्रकल्प संचालक प्रदीप देशपांडे. आस्थापना संचालक शैलेश गोसावी ,प्राचार्य डॉ .व्ही .एन. सुर्यवंशी वित्त विभागाचे रजिस्ट्रार गिरीश नातू उपस्थित होते.सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की समारंभाचे प्रमुख अतिथी तर संस्थेच्या उपाध्यक्ष प्राचार्या डॉ. सौ. सुहासिनी संत प्रमुख अतिथी होत्या.समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त व सहखजीनदार डॉ. आर. पी. देशपांडे होते.
प्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ. सौ. दीप्ती देशपांडे यांच्या कार्य कर्तृत्वाचा परिचय करून देणारी व संस्थेच्या विकासाचा व विस्ताराचा आढावा घेणारी ध्वनी -चित्रफीत दाखविण्यात आली. निर्मिती एच.पी. टी. महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या व दवप्रभा प्रॉडक्शन्सच्या डॉ. वृंदा भार्गवे यांनी केली. प्रसंगी डॉ. अशोक पत्की ‘शब्दमल्हार’ प्रकाशनचे स्वानंद बेदरकर यांनी संवाद साधला. त्यांनी अनेक मालिकांच्या शीर्षक गीतांना व भावगीतांना चाली लावताना आलेले अनुभव सांगितले. त्यांनी स्वरबद्ध केलेली गीतांचे मुखडे ही सादर केले. अनेक मोरूची मावशी, एका लग्नाची गोष्ट नाटकांमधील गाण्यांच्या आठवणी सांगितल्या. संगीत क्षेत्रात बदलते प्रवाह, आधी चाल तयार करून मग गीत लिहिण्याची सुरु झालेली प्रथा त्यांनी सांगितली. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर , सुमन कल्याणपुर , अनुराया पौडवाल यांच्या बरोबरच्या आठवणी ही सांगितल्या. त्यांनी वेळ प्रसंगी केलेल्या कवितां बद्दलही त्यांनी आठवणी सांगितल्या.अनेक आठवणींना उजाळा देत श्री पत्की यांनी आपला संगीत प्रवास श्रोत्यांसमोर उलगडून दाखविला.
संस्थेच्या सचिव डॉ सौ. दीप्ती देशपांडे यांना संस्थेतर्फे देण्यात आलेल्या सन्मान पत्राचे वाचन विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी केले. सत्काराला उत्तर देताना सचिव डॉ. सौ. दीप्ती देशपांडे संस्थेचे दिवंगत सचिव सर डॉ मो. स. गोसावी व दिवंगत अध्यक्ष प्रिं. एस. बी. पंडित सरांच्या स्मृतींना वंदन करून आपले मनोगत व्यक्त केले. यादोघांनी ६५ वर्षे संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात स्वतःला वाहून घेतले. त्यांनी पुढे सांगितले, की स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. त्यांनी डॉ. सुनंदाताई गोसावींच्या गौरवावस्पद कार्याचा उल्लेख केला. सर डॉ मो. स.गोसावी व प्रिं पंडित यांनी त्यांच्या पुण्याईचा वारसा आपल्याला दिला आहे, तो एकजुटीने पुढे चालवायचा आहे.
प्रसंगी संस्थेचे विश्वस्त डॉ आर. पी. देशपांडे यांची संस्थेचे प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती घोषित करण्यात आली. संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ सुहासिनी संत यांना अध्यक्ष पदावर नियुक्ती घोषित करण्यात आली. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .आपल्या अधक्षीय भाषणात डॉ. आर पी देशपांडे यांनी सचिव डॉ . सौ. दीप्ती देशपांडे यांच्या कार्याबद्दल विश्वास व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची प्रगती होईल अशी आशा व्यक्त केली. संस्थेची विविध पदांवरील जबाबदारी त्यांनी अत्यंत यशस्वीपणे संभाळली आहे. त्यांनी अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी प्रसंगी शिल्पकार वसंत खैरनार, यतीन पंडित, कल्पेश गोसावी, अक्षय देशपांडे संस्थेचे सन्माननीय देणगीदार, जयंतराव कुलकर्णी , विक्रमभाई कपाडिया, अतुल चांडक, क्षत्रिय, श्रीमती अमिता क्षत्रिय, संस्थेच्या विविध महाविद्यालयांचे निवृत्त प्राचार्य हर्षवर्धन कडेपुरकर , डॉ के. आर. शिंपी, डॉ. हेमंत कोचरगावकर, डॉ. विनायक गोविलकर, प्राचार्य डी.के. गोसावी यांना प्राचार्य डॉ खंडेलवाल प्राचार्या डॉ. कविता पाटील, उप प्राचार्या डॉ लीना भट यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला संस्थेच्या महाविद्यालयांचे प्राचार्य. उपप्राचार्य प्राध्यापक व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मुग्धा जोशी व डॉ. स्नेहा रत्नपारखी यांनी केले. बी. वाय.के. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सुर्यवंशी यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो .८२०८१८०५१०