Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

β : नागपूर:⇔स्वामी विवेकानंद जगाच्या पाठीवरील “महान युगपुरुष”-(प्रतिनिधी: रमेश लांजेवार)

β : नागपूर:⇔स्वामी विवेकानंद जगाच्या पाठीवरील "महान युगपुरुष"-(प्रतिनिधी: रमेश लांजेवार)

019096

      १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती.🌹
स्वामी विवेकानंद जगाच्या पाठीवरीलमहान युगपुरुष

β : नागपूर:⇔स्वामी विवेकानंद जगाच्या पाठीवरील "महान युगपुरुष"-(प्रतिनिधी: रमेश लांजेवार)
β : नागपूर:⇔स्वामी विवेकानंद जगाच्या पाठीवरील “महान युगपुरुष”-(प्रतिनिधी: रमेश लांजेवार)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि.10 जानवरी 2025
β⇔नागपूर,ता.10 (प्रतिनिधी: रमेश लांजेवार):-स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे झाला.स्वामी विवेकानंद यांची आवड आणि अभ्यास प्रगल्भ होता.त्यांना संगीत, साहित्य आणि तत्वज्ञान यात विशेष रस होता.याव्यतीरीक्त पोहणे, घोडेस्वारी व कुस्ती हे त्यांचे आवडते छंद होते. वयाच्या २५ व्या वर्षी स्वामीजींनी वेद,पुराण, बायबल, कुराण,धम्मपद,तनाख, गुरू ग्रंथ साहिब,दास कॅपिटल, भांडवलशाही, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या सर्वच विचारधारा एकत्र केलेल्या होत्या.म्हणजे त्यांना इतर सर्व ज्ञान तर होतेच परंतु जगातील संपूर्ण धर्माचा अभ्यास त्यांनी अवगत केलेला होता.यावरून असे वाटते की स्वामी विवेकानंदांना संपूर्ण ब्रम्हांडाचे ज्ञान असल्याचे दिसून येते. याला दैवी शक्तीच म्हणावे लागेल.कालांतराने रामकृष्ण परमहंस यांच्या आश्रयाला गेले व रामकृष्ण परमहंस यांच्या रहस्यमय व्यक्तीतत्वाने ते अत्यंत प्रभावीत झाले आणि त्यांचे संपूर्ण जीवन बदलले.स्वामींनी १८८१ मध्ये रामकृष्ण परमहंस यांना आपले गुरू केले.
१८८६ मध्ये रामकृष्ण परमहंस यांच्या मृत्यूनंतर स्वामी विवेकानंदांच्या कार्याला एक नवीन वळण आले.वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी भगवे वस्त्र धारण केले व संपूर्ण भारतभर पायी प्रवास सुरू केला.देशातील गरीबी आणि सामाजिक दुष्टांची अवस्था पाहून त्यांची मनस्थिती दु:खावली गेली.काही दिवसांतच शिकागो येथे जगातील धर्म परिषद होणार असल्याची माहिती मिळाली.११ सप्टेंबर १८९३ ला शिकागो येथे जगातील धर्म परिषद भरली.भारताचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद तेथे पोहोचले.तिथे अनेकांनी खूप प्रयत्न केले की स्वामी विवेकानंद यांना बोलायला वेळ मिळुन नये.परंतु एका अमेरिकन प्राध्यापकाच्या प्रयत्नाने त्यांना बोलायला थोडा वेळ मिळाला.त्यानी जागतिक धर्म परिषदेतील धर्म संसदेतील भाषणाची सुरुवात “बंधु व भगिनी”असे करून केली. यानंतर त्यांच्या भाषणाचे विचार ऐकून संपूर्ण धर्म परिषद स्तब्ध झाली व टाळ्यांचा कडकडाट झाला जनुकाय आकाशवाणी झाली की काय आणि स्वामी विवेकानंद जगप्रसिद्ध झाले व त्यांचे अमेरिकेत जोरदार स्वागत झाले. युगानुयुगे आपल्या तेजस्वी विचारांची ज्योत संपूर्ण जगात सकारात्मक व शांती प्रदान करणारी रहावी या उद्देशाने  स्वामी विवेकानंद यांनी आपले कार्य पुढे सुरूच ठेवले. एकतेचा संदेश जगाला देऊन सर्व मानवजातीला बंधुतेचा, मानवतेचा संदेश देणारे व सुखशांती निर्माण करणारे कार्य स्वामी विवेकानंद यांनी केले.त्यांनी जगाचा इतिहास आणि पाश्चात तत्वज्ञानांचा अभ्यास महाविद्यालयीन जीवनातच केला. अनेक धर्माच्या तात्विक अभ्यासामुळे त्यांनी अमेरिकेतील शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व त्यांनी केले.
११ सप्टेंबर १८९३ या दिवशीच्या त्यांच्या भाषणाने संपूर्ण सभा प्रभावित झाली व १७ दिवसाच्या या परिषदेत हिंदुस्थानातील प्रभाव दिसून आला.मुलांचा सर्वांगीण विकास व त्यांच्या कौशल्यांचा विकास व्हावा, मुले आत्मनिर्भर व्हावी असे त्यांचे  स्पष्ट मत  होते. त्यांच्या या शैक्षणिक विचारांची प्रासंगिकता आजच्या युवा पिढींनी अवगत करायला हवी. मूलांचा शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक विकास होऊन मन,बुद्धी विकसित करणारे, स्वावलंबी, चारित्र्यसंपन्न ओळख निर्माण करणारे शिक्षण असावे असे त्यांचे मत होते.
भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीबद्दल गाड अभिमान असला, तरी त्यात शिरलेल्या अनिष्ट रुढी, परंपरा, जातीभेद यांसारख्या हीन गोष्टींवर त्यांनी भाषणांतून कडाडून हल्ला चढवला. निराकार समाधीत मन रहाण्याची स्वत:ची स्वाभाविक प्रवृत्ती बाजूला सारून त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखाचा योग्य पातळीवरही विचार केला आणि त्यांच्यासाठी झटले व सर्वस्वाचे समर्पण म्हणजेच खरा संन्यास’ हे वचन सार्थ केले. स्वामी विवेकानंद हे सर्व तरुणांचे आजही प्रेरणास्थान आहेत. अशा या महान तत्त्वज्ञानी महापुरुषाला माझा सलाम.आज देशात आपल्याला जी काही एकता आणि बंधुता दिसून येत आहे त्याचे संपूर्ण श्रेय स्वामी विवेकानंदांना जाते.१८९९ साली स्वामीजींनी पुन्हा पश्चिमेकडे प्रवेश केला आणि भारतीय संस्कृतीचा, अध्यात्माचा संदेश प्रसारित केला.अशाप्रकारे परदेशातही त्यांनी भारताची भूमिका मांडण्याचे काम त्यांनी केले.असा तेजस्वी महापुरुष भारत भुमिला लाभला हे भारतीयांचे अहोभाग्यच आहे.आजही आपला देश स्वामी विवेकानंदांच्या विचारधारेवर चालतो ही भारतीयांसाठी स्वाभिमानाची बाब आहे.अशा महापुरुषांनी पुन्हा-पुन्हा जन्म घ्यावा असे वाटते.परंतु आजही स्वामीजींची आस्था सर्वांच्या ह्रदयात घर करून आहे.मी संपूर्ण भारतवासीयांना विनंती करतो की स्वामी विवेकानंदांचे विचार अवश्य अवगत करावे. आपणा सर्वांचाच मार्ग सुखरूप व मोकळा होईल.जोपर्यंत सुर्य,चंद्र,तारे,आकाश-पाताळ,ग्रह-तारे आहेत तोपर्यंत स्वामीजींचे विचार सर्वांच्याच ह्रदयात राहिल.स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सरकारने, सामाजिक संघटना, शाळा-महाविद्यायासह संपूर्ण युवावर्गानी आजच्या दिवशी वृक्षलागवड केली पाहिजे.यामुळे गुरांना चारा व संपूर्ण मानव जातीला आणि प्राणीमात्रांना शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळण्यास मोठी मदत होईल.यामुळे अनेकांचे प्राण आपल्याला वाचविता येईल व प्रत्येक झाडाच्या पानात, फुलात,फळात व जळामुळात आपल्याला स्वामींचे अवश्य दर्शन होईल.स्वामीच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.जय हिंद!

लेखक   : 
               रमेश कृष्णराव लांजेवार
 (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर) मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510 

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

 

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!