Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिक:⇔ 2ऑगस्टला नाशिक येथे नीती आयोग समितीची बैठक-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

β : नाशिक:⇔ 2 ऑगस्टला नाशिक येथे नीती आयोग समितीची बैठक-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

018518

2 ऑगस्टला नाशिक येथे नीती आयोग समितीची बैठक 

β : नाशिक:⇔ 2 ऑगस्टला नाशिक येथे नीती आयोग समितीची बैठक-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक:⇔ 2 ऑगस्टला नाशिक येथे नीती आयोग समितीची बैठक-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  शुक्रवार  : दि, 26 मे  2024

β⇔नाशिक, दि. 26(प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- नीती आयोगाच्या पश्चिम विभागीय समितीची बैठक 2 ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. बैठकीत सचिव स्तरावरील सुमारे 80 अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील अशा स्वरूपाची बैठक नाशिकमध्ये होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

             अमित शहा यांनी या बैठकीत राज्यांना सशक्त करण्यासाठी आणि केंद्र व राज्यांमधील धोरणात्मक आराखड्यांची अधिक चांगली समज वाढविण्यासाठी सहकारी संघराज्यावर भर देणार आहेत. तंटे सोडविण्यासाठी आणि सहकारी संघराज्यांना चालना देण्यासाठी त्यांनी या झोनल कौन्सिलच्या बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत जवळपास 80 मुख्य सचिव, प्रधान सचिव उपस्थित राहतील. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ हे बैठकीचे सूक्ष्म नियोजन करणार आहेत.

           या बैठकीला मुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि राज्य व केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. महिला व बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांचा आणि बलात्काराच्या प्रकरणांचा जलद तपास, बलात्कार आणि पांक्सो कायद्यांतील खटल्यांचा निपटारा करण्यासाठी जलद गती विशेष न्यायालयाच्या योजनेची अंमलबजावणी आणि सर्वसामान्यांच्या समस्यांवर चर्चा होईल. रस्ते जोडणी, वीज उद्योग, बँक सुविधा, पोषण अभियानाद्वारे कुपोषण दूर करणे, शाळेतील मुलांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, आयुष्यमान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सरकारी रुग्णालयाचा सहभाग यावरही चर्चा होईल.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूजची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.   ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
04:56