





अचूक निर्णय क्षमता ही यशस्वी उद्योजकतेची गुरुकिल्ली : सी. ए. किरण सागोरे

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 22 जून 2024
β⇔, गंगापूर (नाशिक) दि.22 (प्रतिनिधी : छाया लोखंडे ):- अचूकनिर्णय क्षमता ही यशस्वी उद्योजकतेची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन सी. ए. किरण सागोरे यांनी केले. शिक्षण महर्षी सर डॉ. एम. एस. गोसावी सरांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त एस. एम. आर. के. कॉलेज मध्ये ‘ उद्योजकतेचे सामर्थ्य ‘ या विषयावर सी ए किरण सागोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा तसेच उद्योजकता विकास कक्षा तर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर कॉलेजच्या ब्रांच सेक्रेटरी डॉ.लीना भट,प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर आणि उप प्राचार्य डॉ.नितीन सोनगिरकर उपस्थित होते.सुरुवातीला मान्यवरांनी सर डॉ.एम. एस. गोसावी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.
प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर यांनी प्रास्ताविक केले. सी. ए. किरण सागोरे यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थिनींना उद्योजिका होण्यासाठी प्रेरणा दिली. आपल्या व्याख्यानात ते म्हणाले की मर्यादित वेळेत अमर्याद स्वप्ने पूर्ण करणे उद्योजकता विकासामुळे शक्य होते.रोजगार निर्मिती हे उद्योजकांचे सामाजिक योगदान असते. उद्योजकाचे कौशल्य म्हणजे वित्त, मनुष्य बळ, बाजारातील स्पर्धा , स्पर्धकांची व्यावसायिक नीती अशा सर्व आव्हानांना सामर्थ्याने तोंड देणे होय. यशस्वी उद्योजका जवळ उदात्त ध्येय, मजबूत संघ,ग्राहकांशी सौहार्दपूर्ण संबंध, भांडवलाचा अविरत पुरवठा आणि आकस्मिक संकटाला तोंड देण्याची क्षमता असलीच पाहिजे .
महिलांना उद्योग जगतात अनेक संधी उपलब्ध आहेत फक्त अनुभव, कौशल्य, कौटुंबिक पाठिंबा, सर्जनशीलता, वेळेचे व्यवस्थापन आणि धैर्य यांच्या समायोजनातून योग्य संधीचा लाभ घेता आला पाहिजे. उपप्राचार्य डॉ. नितीन सोनगिरकर यांनी आभार प्रदर्शन केले. सौ. प्रणेता निकुंभ यांनी सूत्रसंचालन केले. ह्या कार्यक्रमाला सर्व शाखांचे समन्वयक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सी .ए. किरण सागोरे ह्यांचा सत्कार करतांना प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर , उपप्राचार्य डॉ . नितीन सोनगिरकर , डॉ. लिना भट आदि दिसत आहेत .
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)
©सदर लेखाबाबत संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. सदर मत सर्वस्वी लेखकाचे असून त्यांचीच जबाबदारी आहे,