β : नाशिक :⇔एसएमआर के महाविद्यालयात कॉमर्स वीकचा समारोप- (प्रतिनिधी : छाया लोखंडे-गिरी)
β : नाशिक :⇔एसएमआर के महाविद्यालयात कॉमर्स वीकचा समारोप- (प्रतिनिधी : छाया लोखंडे-गिरी)
एसएमआर के महाविद्यालयात कॉमर्स वीकचा समारोप
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 14 जानेवारी 2024
β⇔,नाशिक, दि.14 ( प्रतिनिधी : छाया लोखंडे-गिरी ):- एस एम आर के महाविद्यालयात कॉमर्स वीकचा समारोप करण्यात आला. गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ.राम कुलकर्णी हे प्रमुख अतिथी तर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कविता पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्या डॉ.नीलम बोकील डॉ.नितीन सोनगिरकर उपस्थित होते. कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स असोसिएशनच्या प्रमुख डॉ.आश्लेषा कुलकर्णी यांनी कॉमर्स वीक २०२४ चा अहवाल सादर केला. निबंध स्पर्धा,रिसर्च पेपर प्रेझेंटेशन स्पर्धा , मॅनेजमेंट गेम्स स्पर्धातील विजेत्यांना प्रमुख अतिथी आणि अध्यक्षांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. टी वा य बी कॉमची मीनुकुमारी यादव हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून गौरविण्यात आले. संजरिया कोकणी हीचा सी ए फाऊंडेशन परीक्षेत यश मिळविल्या बद्दल सत्कार करण्यात आला.स्पर्धेच्या परीक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ.मनीषा जोशी, श्री.संदीप ओढेकर,सौ.हेमा देशमुख,सौ.प्रणेता निकुंभ,सौ.वैशाली गायकवाड ,सौ.वैशाली चौधरी,सौ.संजोग अहिरवार यांनी परिश्रम घेतले. डॉ.महेंद्र धोंडगे पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. प्रा.यशवंत केळकर आणि प्रा.वाल्मीक गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो ८२०८१८०८१०