





चेहेडी बुद्रुक येथे वृक्षरोपण करून वाढदिवस उत्साहात साजरा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 9 मार्च 2024
β⇔नाशिक (चेहडी ) दि.9(प्रतिनिधी : पांडुरंग गुरव ):- आज रोजी प्रभाग क्रमांक एकोणावीस चेहेडी बुद्रुक येथे नाशिक जिल्हा गुरव समाज सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गुरव यांचा 54 वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यावेळी पदर मोड करून स्वतःच्या अंगणात निसर्गात सानिध्यात भर पडावी, हा दृष्टिकोन मनामध्ये ठेवून स्वखर्चाने वनस्पती व फुले अशा 87 झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले . तसेच गरजू शालेय विद्यार्थ्यांना व ह्याचे वाटप करण्यात आले. ही झाडी मोठी झाल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाच मोफत वाटण्याचा संकल्प पांडुरंग गुरव यांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रमाला परिसरातील बाळ गोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते . हर्षदा पांडे, ओंमकार गुरव, समीर कोकाटे, ऋषिकेश गुरव ,संकेत मुनोत, रविशंकर गुरव, साहिल सातपुते, यशराज गुरव, सार्थक गायकवाड, कस्तुभ गुरव , दर्शन संगमनेरे इत्यादी बाळ गोपाळ उपस्थित होते.,
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510