Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

β :नाशिक रोड :⇔बिटको महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न..- (प्रतिनिधी : संजय परम सागर ).

β :नाशिक रोड :⇔बिटको महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न..- (प्रतिनिधी : संजय परम सागर ).

0 0 2 3 9 9

बिटको महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न.

β :नाशिक रोड :⇔बिटको महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न..- (प्रतिनिधी : संजय परम सागर ).
β :नाशिक रोड :⇔बिटको महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न..- (प्रतिनिधी : संजय परम सागर ).

 

  β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि.4 जानेवारी 2024

 β⇔नाशिक रोड, ता 4 (प्रतिनिधी : संजय परम सागर ) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर काव्य करंडक बीवायके महाविद्यालयातील संघाने पटकावला,  नाशिकरोड येथे  ” कविता,कादंबऱ्या,नाटक, तत्त्वज्ञान अर्थशास्त्र यांच्यावर लेख अशा विविध स्तरातून लेखनप्रवास मी केला . कविता म्हणजे उत्स्फूर्त चिंतनाचा प्रवाह असून चांगला कवी होण्यासाठी उत्तम कविता तारुण्यातच वाचल्या पाहिजे. कविता म्हणजे अद्भुत आनंदाची अनुभूती आहे.प्रतिभा आणि प्रतिमा यांचा सुंदर अविष्कार कवितेतून प्रकट व्हावा, सामाजिक जाणीवेची कविता तयार करा,” असे कवी व माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालय व फुले – आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन ( फासा) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आंतरमहाविद्यालयीन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘ राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा ‘ महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर बी.जी वाघ यांच्यासह परीक्षक अरुण घोडेराव व अशोक भालेराव, मराठी विभाग प्रमुख डॉ. के. एम. लोखंडे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ.मंजुषा कुलकर्णी या होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ. के एम लोखंडे यांनी स्पर्धेविषयी माहिती देऊन स्वागतपर प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.शरद नागरे यांनी केला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाने सदर राज्यस्तरीय काव्य करंडक स्पर्धा आयोजनाचे हे २६ वे वर्ष असून स्त्री ही शक्ती असून तिची अस्मिता फक्त पुरुषांच्या संदर्भात मर्यादित नसून तिचे स्वातंत्र्य समाज घडण्यासाठी आवश्यक आहे असे सांगितले. याप्रसंगी विविध महाविद्यालयातून एकूण १२ संघातील २४ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या कविता सादर केल्या . यावेळेस सावित्रीचे गीत कु. स्नेहल भालेराव हिने तर समीक्षा पगारे हिने स्वगत सादर केले.
सकाळच्या उद्घाटन सत्रात प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्या अध्यतेखाली , विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. के. सी. टकले, उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पठारे, डॉ. आकाश ठाकूर, उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे, मराठी विभागप्रमुख डॉ. के. एम. लोखंडे स्पर्धाप्रमुख प्रा.आर.बी. बागुल आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कु. स्नेहल भालेराव, समीक्षा पगारे, दर्शन अभंग यांनी स्वागत गीत सादर केले. प्रा. उषा पाटील यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला . स्पर्धेचे परीक्षण अशोक भालेराव व अरुण घोडेराव यांनी केले. याप्रसंगी परीक्षकांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रत्येक स्पर्धा ही खिलाडूवृत्तीने घ्यावी.काव्यवाचन सादर करणे एक कौशल्य असून ते सादर करण्यास साठी आपले व्यक्तिमत्व विकासात अमुलाग्र बदल होण्यासाठी अशा सहभागी होऊन व्यक्त व्हा, आज शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. काव्य कला प्रकटीकरण मनाला जोडणारी असते असे सांगितले.
स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे :
राज्यस्तरीय फिरता काव्य चषक मैथिली ऋषिकेश निकम व वरद रवींद्र सोनवणे ( बी वाय के महाविद्यालय, नाशिक )
प्रथम पारितोषिक ( रु.५०००/-) – कु.प्रतीक उत्तम निकम ( शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालय, पनवेल )
द्वितीय पारितोषिक ( रु.३०००/-) पवन परमेश्वर शेळके ( एमजीएम विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर )
तृतीय पारितोषिक (रु.२०००/-) – निशा रावसाहेब जाधव ( मातोश्री शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नाशिक )
सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ.उत्तम करमाळकर व वृषाली उगले यांनी केले तर आभार प्रा.राजेश बागुल यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.शरद नागरे, प्रा.राजेश बागुल, डॉ. संभाजी शिंदे , प्रा.उषा पाटील, प्रा.डॉ.आरती गायकवाड , मीना गिरडकर , सुचिता पुंडलिक यासह विद्यार्थी प्रतिनिधी -गणेश कसबे, विद्यार्थिनी प्रतिनिधी -ज्ञानेश्वरी ताले , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मराठी विभागातील विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले :मो. ८२०८१८०५१० 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 3 9 9

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!