0
1
2
9
1
1
नियमबाह्य प्रभारी केंद्रप्रमुखांच्या नियुक्त्यांविरोधात शिक्षक परिषदेचे आंदोलन ! सर्व नियमबाह्य केंद्रप्रमुखांनी सोडला पदभार
β⇒ दिव्य भारत बी एसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि. १५ सप्टेंबर २०२३
β⇒ दिंडोरी, ता १५ ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव ) :- येथील पंचायत समिती मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्राथमिक विभागाचे संस्थापक राज्यकोषाध्यक्ष संजय बबनराव पगार यांचे नेतृत्वात गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांना बेकायदेशीर व नियमबाह्य प्रभारी केंद्रप्रमुखांच्या नियुक्तींच्या विरोधात निवेदन देण्यात आले.जि.प.नाशिक प्रशासन अंतर्गत शाळांतील जिल्ह्यातील २४४ मंजुर पदांपैकी २११पेक्षा अधिक पदांचा पदभार प्राथमिक शिक्षकांकडे देऊन अनियमितता करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार बाल शिक्षण हक्क कायद्यान्वये शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही अशैक्षणिक कामास मज्जाव केला असताना त्यांची प्रशासनाने केंद्रप्रमुखपदी नियुक्ती करून संबंधित विद्यार्थी हिताला बाधा पोहोचण्याचे काम झाले आहे. विद्यार्थीहीत लक्षात घेता, सदरील केंद्रप्रमुख ज्यांनी शिक्षक असतांना अतिरिक्त प्रभार स्वीकारला असल्याने त्यांच्या कार्यसुचीनुसार अध्यापन होत नाही. त्या सर्वांनी आज केंद्रप्रमुख पदभारावर बहिष्कार टाकुन शिक्षक परिषदेला पाठींबा दिला.
शिक्षक परिषदेने विद्यार्थी हित बघता प्रभारी केंद्रप्रमुख नियुक्त्यांविरोधात तीव्र आंदोलनाचे निवेदन दिले.
याप्रसंगी संस्थापक राज्य कोषाध्यक्ष संजय पगार, तालुकाध्यक्ष- रावसाहेब जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष- शांताराम कापसे, कार्यवाह- रवींद्र ह्याळिज, कार्याध्यक्ष – सुभाष बर्डे, राजेंद्र कापसे,कोषाध्यक्ष- नितीन शिंदे, कार्यकारी अध्यक्ष- अशोक पवार, उपाध्यक्ष- संजय सोनवने, शाहुल वानखेडे,शिवाजी भोसले,दिपक खैरनार, प्रभारी केंद्रप्रमुख -मंगलसिंग देवरे,संजय जगताप,श्रावण भोये, तारा धूळे, अभिमन बहिरम, प्रविण गरुड, सचिन वसमतकर,प्रकाश सोनवणे,बळवंतसिंग ठाकरे,कलावंत मावची आदी उपस्थित होते.
β⇒ प्रतिक्रिया :-
प्राथमिक शिक्षकांना देण्यात आलेल्या या नियमबाह्य प्रभारी केंद्रप्रमुख पदभारामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत असुन केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी प्रशासन टाळाटाळ करत आहे. याविरोधात तालुक्यासह जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल. :– संजय बबनराव पगार – संस्थापक राज्य कोषाध्यक्ष , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रा.वि.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो .८२०८१८०५१०