बिटको महाविद्यालयाचे हिंगणवेढे येथे श्रमसंस्कार शिबीराची सांगता
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 14 फेब्रुवारी 2024
β⇔ नाशिकरोड, दि.14 (प्रतिनिधी : संजय परमसागर ):-” राष्ट्र उभारणीत एनएसएस स्वयंसेवकांची महत्त्वाची भूमिका असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे व त्याद्वारे सर्वांचा व्यक्तिमत्व विकास घडवणे तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच समाजसेवेच्या माध्यमातून विशेष उपक्रमातून संस्कार घडवणे हे श्रमसंस्कार शिबिरातच घडते . एनएसएस श्रमसंस्कार शिबिर हे व्यक्ती समाज परिवर्तनाचे एक माध्यम असल्याचे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीचे नाशिक विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनावतीने आयोजित दि. ८ फेब्रुवारी पासून हिंगणवेढे ता. जि. नाशिक येथे सुरू असलेल्या विशेष संस्कार शिबिराच्या दि.१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या समारोप समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. के. सी. टकले, उपप्राचार्य डॉ आकाश ठाकूर, सरपंच सौ. ज्योती नागरे, उपसरपंच सौ. उषा वाघ, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर भोर, हभप क्षीरसागर महाराज, संगीता धात्रक, साहेबराव धात्रक, विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष लक्ष्मण शेंडगे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉ. विशाल माने, जयंत भाभे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात दररोज सकाळच्या सत्रात योगा व आसनानंतर जलसंवर्धन व जलस्रोत स्वच्छता, मतदान जनजागृती व सर्वेक्षण , वृक्ष लागवड व संगोपन जनजागृती, गावातील वृक्षांना चुना वगैरे लावून सुशोभीकरण केले तसेच मंदिर व परिसर स्वच्छता श्रमदान , गावात रॅली काढून जनजागृती यासह महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, प्लास्टिक मुक्ती, संविधान जनजागृती यासह खंडोबा टेकडी स्वच्छता व वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी गावात शाळेत व उपस्थित पाहुण्यांसमोर पथनाट्य सादर केले . या सात दिवसीय शिबिरातील दुपारच्या सत्रात उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे , डॉ. सुदेश घोडेराव, डॉ. उत्तम करमाळकर, शामराव मोगल, प्रा. सचिन बागुल, डॉ निवेदिता खोत, शिवा शहाणे या तज्ञांची अनुक्रमे लोकसंख्या नियंत्रण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन , स्वामी विवेकानंद व आजचा युवक, सेंद्रिय विषमुक्त शेती, व्यक्तिमत्व विकास, जाणता राजा या विषयावर व्याख्यान झाल्याचे माहिती डॉ. संतोष पगार यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ मंजुषा कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात विद्यार्थ्यांशी सुसंवाद करताना ग्रामजीवन जवळून बघायला व अनुभवायला मिळते.गावातील ग्रामीण जीवनाचा अनुभव जवळून बघायला मिळून शिबिराद्वारे योग्य संस्कार मिळतात असे सांगितले. शिबिरात एकूण १०४ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या शिबिरात विद्यार्थी विद्यार्थिनींनीच स्वयंपाक बनवून विविध समित्या बनवून रोजचे संयोजन केले. मान्यवरांच्या हस्ते कु. स्नेहा देशमुख , रामेश्वर देशमुख यांना शिबिरातील उत्कृष्ट स्वयंसेवक विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. हभप क्षीरसागर महाराज यांनी ‘अध्यात्म आणि विज्ञान ‘ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यांनी डॉ. सुधाकर बोरसे तर आभार डॉ. कांचन सनानसे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रसाद पागधरे, ज्योती पेखळे, सोनाली जाधव, वंदना शेवाळे, नितीन जोशी, नरेश पाटील,वसीम बेग, नेहा इनामदार, अनिल सावळे, आकाश लव्हाळे, संग्राम जाधव यांनी प्रयत्न केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510