





व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल मीडिया विंगचा पदग्रहण सोहळा संपन्न
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : धाराशिव : बुधवार : दि 03 डिसेंबर 2024
β⇒ धाराशिव , ( प्रतिनिधी : सुभान शेख ) – धाराशिव: जगभरातील ४७ देशांतील पत्रकारांचे संघटन करून त्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंगचा धाराशिव जिल्ह्यातील पदग्रहण सोहळा नुकताच शासकीय विश्रामगृहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार, राज्य खजिनदार प्रवीण पावले, जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सलीम पठाण, जिल्हा कार्यवाहक कुंदन शिंदे, आणि डिजिटल विंगचे जिल्हाध्यक्ष जुबेर शेख प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
AI तंत्रज्ञानाचा उपयोग आणि भविष्यातील पत्रकारिता
कार्यक्रमात बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांनी सांगितले की, “अत्याधुनिक युगात पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. जो पत्रकार या तंत्रज्ञानाचे ज्ञान घेऊन काम करेल, त्यालाच भविष्य आहे.” त्यांनी AI कसे कार्य करते, याचे प्रात्यक्षिकही सादर केले.
संघटनेची उद्दिष्टे
जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी संघटनेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला तसेच भविष्यातील योजनांची माहिती दिली.
नवनियुक्त पदाधिकारी
पदग्रहण सोहळ्यात धाराशिव जिल्ह्यातील खालील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले:
- जिल्हा कार्याध्यक्ष: मनोज जाधव
- जिल्हा उपाध्यक्ष: विशाल जगदाळे, सर्जेराव गायकवाड
- जिल्हा कार्यकारिणी सदस्य: राम थोरात, जावेद शेख
- तालुकाध्यक्ष:
- तुळजापूर: सचिन तोग्गी
- उमरगा: बालाजी सारसाने
- वाशी: शोएब काझी
- भूम: तानाजी सुपेकर
- परंडा: शहानवाज तांबोळी
- तालुका कार्याध्यक्ष: अहमद अन्सारी (तुळजापूर)
- तालुका सरचिटणीस: सचिन शिंदे (तुळजापूर), राहील पटेल (उमरगा)
- शहराध्यक्ष: प्रतीक वाघे (तुळजापूर), सुभान शेख (येडशी)
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जाधव यांनी केले, तर आभारप्रदर्शन जुबेर शेख यांनी मानले. या सोहळ्यासाठी जिल्ह्याभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )