β : येडशी(धाराशिव):⇔”लातुर-येडशी-बार्शी” महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा”! रात्री-अपरात्री वाहनधारकांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास-(प्रतिनिधी : सुभान शेख)
β : येडशी(धाराशिव):⇔"लातुर-येडशी-बार्शी" महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा"! रात्री-अपरात्री वाहनधारकांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास-(प्रतिनिधी : सुभान शेख)
“लातुर – येडशी – बार्शी” महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा“
रात्री – अपरात्री वाहनधारकांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 06 ऑगस्ट 2024
β⇔येडशी(धाराशिव), दि.06 (प्रतिनिधी : सुभान शेख ):- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे राष्ट्रीय राज्य महामार्ग “लातुर – येडशी – बार्शी” या महामार्गावर मागील अनेक वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवाशी व वाहनधारकांना जीव मुठीत धरून त्रास सहन करावा लागत आहे. या लातुर – बार्शी रोड वरील पहाटे च्या सुमारास लक्झरी बस ये – जा करतात तर पहाटे च्या पुढे ते दोनशे ते तीनशे बसेस तसेच दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी, अवजड वाहने, या राष्ट्रीय राज्य महामार्ग लातुर – बार्शी रोड वरुन दिवस – रात्री – अपरात्री धावतात.
राष्ट्रीय राज्य महामार्ग लातुर – बार्शी रोड लातुरहुन बार्शीकडे जाण्याचा राष्ट्रीय राज्य महामार्ग येडशीपर्यंत औट पोस्ट पोलिस ठाणे जवळ असलेला रोड लातुरचे बांधकाम विभागाच्या अंतर्गत असणारा धाराशिव तालुक्यातील येडशी येथील सुताराच्या शेतापासून ते औट पोस्ट पोलिस ठाणेपर्यंत मोठमोठे खड्डे पडुन संपूर्ण रोड खराब झाला आहे. सदर महामार्ग लातुर बांधकाम विभागाने राष्ट्रीय राज्य महामार्ग वरील मोठमोठे खड्डे पडलेले खड्डे बुजविण्यासाठी गुत्तेदारला काम दिले होते. या गुत्तेदार ने मजुर लाऊन नुकतेच नावाला मोठमोठ्या पडलेल्या खड्ड्यामध्ये बारीक कचखडी टाकून बोगस पद्धतीने खड्डे बुजविले होते. हे खड्डे बुजवून फक्त दोन महिने झाले होते. या दोन महिन्यांतच खड्डे बुजविलेले पाऊसाच्या पाण्याने रोड वरील साचत असलेले पाऊसाचे पाणी बुजविलेले खड्डे उघडकीस पडले आहे, त्यामुळे अनेक अपघात वारंवार होत प्रवाशी जखमी होत आहेत. या उखडलेल्या व उघडकीस पडलेले खड्डयाकडे अधिकारी वर्ग खाली मान घालून अनेक वेळेस दुर्लक्ष करीत आहे. तसेच लातुर – बार्शी रोड वरील या पडलेल्या खड्ड्याचे फायदा उचलून वाहन धारकांची चोर लुटमार करीत आहे. या लातुर – बार्शी रोड वरील चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. या चोरांचा सुळसुळाट वाढल्यामुळे प्रवाश्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
येडशी मधील औट पोस्ट पोलिस ठाणे येडशी अंतर्गत असणारे – धाराशिव ग्रामिण पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक – मारुती शेळके दररोज रात्री – अपरात्री येडशीमध्ये पोलिस प्रशासनाची पेट्रोलिंगची गाडी फिरविले जाते. परंतु पोलिस प्रशासनाला सुद्धा राष्ट्रीय राज्य महामार्ग लातुर – बार्शी रोड वरील जीव मुठीत घेऊन, मोठमोठे खड्डे पडलेल्या खड्ड्यातुन आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी या लातुर बांधकाम विभागाने लवकरात – लवकर दखल घेऊन या गुत्तेदार बरोबर सोबत राहुन समोर उभारुन या राष्ट्रीय राज्य महामार्ग लातुर – बार्शी रोड वरील पडलेले मजबुतीकरण करून घ्यावे. तसेच , औट पोस्ट पोलिस ठाणे जवळ मोठमोठे खड्डे पडलेल्या बाजुला असलेले मोठमोठे व्यावसायिक दुकानदार आहेत. या व्यावसायिक दुकाना समोर लातुर – बार्शी रस्त्यावर पाऊसाचे पाणी साचत आहे. तर येडशी मधील नागरिकांच्या दारा समोरील गावठाणचे पाणी रस्त्यावर पाणी येत आहे. या गावठाणचे पाणी काढण्यासाठी ग्रामपंचायत ने नागरिकांच्यादारा समोरील दुषित पाणी जाण्यासाठी नाली काढुन दिले नाही. अगोदरही येडशी मधील तीन व्यक्ती खेड्या – पाड्यातील महिला दोन चाकी घेऊन या खड्डयात पडून जखमी झाले होते. तेव्हाही लातुर बांधकाम विभागाने दखल घेतली नाही. म्हणुनच अशी म्हणायची वेळ आली अशी की,'”लातुर -येडशी- बार्शी” महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा’. तरी या राज्य शासनाने राष्ट्रीय राज्य महामार्ग अंतर्गत असलेले लातुर बांधकाम विभागाकडे चौकशीचे आदेश काढुन लवकर रस्ता दुरुस्ती करून सुरळीत खड्डे बुजविण्यासाठी आदेश देण्यात यावेत. अशी मागणी प्रवाशी , वाहनधारकांनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )