β : सिन्नर :⇔केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , 27 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर-(प्रतिनिधी:सुरेश इंगळे)
β : सिन्नर :⇔केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , 27 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर-(प्रतिनिधी:सुरेश इंगळे)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , 27 जानेवारीला नाशिक दौऱ्यावर
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 26 जानेवारी 2024
β⇔ सिन्नर, दि.26 ( प्रतिनिधी : सुरेश इंगळे ) :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनने 27 जानेवारीला सकाळी दहा वाजता परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्याचे ठरविले असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार असून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभा नगर, मुंबई नाका येथे ही परिषद संपन्न होणार आहे. परिषदेनिमित्त बँकिंग क्षेत्रातील आव्हाने व व्यवस्थापनातील नवनवीन बदलांचा वेध घेणारे सहा परिसंवाद यावेळी होणार आहेत.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०८१०