β : सुरगाणा (नाशिक) :⇔ ग्रामसेवक चांगला, कामसू, प्रामाणिक असेल तरच गावाचा विकास शक्य : उपमुख्य कार्यकारी-वर्षा पडोळ-(प्रतिनिधी : रतन चौधरी)
β : सुरगाणा (नाशिक) :⇔ ग्रामसेवक चांगला, कामसू, प्रामाणिक असेल तरच गावाचा विकास शक्य : उपमुख्य कार्यकारी-वर्षा पडोळ-(प्रतिनिधी : रतन चौधरी)
ग्रामसेवक चांगला,कामसू , प्रामाणिक असेल तरच गावाचा विकास शक्य : उपमुख्य कार्यकारी-वर्षा पडोळ
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 8 जून 2024
β⇔सुरगाणा (नाशिक), दि.8(प्रतिनिधी : रतन चौधरी ):- सुरगाणा तालुक्यात शासनाच्या विविध प्रकारच्या योजना या ग्रामपंचायतस्तरावरुन राबविण्यात येतात. म्हणून ग्रामसेवक चांगला,कामसू, प्रामाणिक असायला पाहिजे. गावपातळीवरील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाच्या वर्षा पडोळ यांनी नीती आयोगाच्या आकांक्षी तालका आढावा बैठकीत केले. यावेळी आढावा प्रसंगी गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी सांगितले की, निती आयोगाने भारतील ५०० तालुके निवडलेले आहेत, यापैकी महाराष्ट्रातून २७ तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यातून एकमेव सुरगाणा तालुक्याची निवड झाली आहे. या करीता चिंतन शिबीर घेण्यात आले होते.वेळोवेळी बैठका आयोजित केल्या जातात.
प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवले जाते. किलबिल मेळाव्यात बालकांचे आवाज, सॅम आणि मॅम, कुपोषित,तीव्र कुपोषित बालक कुपोषणातून मुक्त झाले पाहिजे. या करीता पालकांना कोंबड्या वाटप करण्यात आल्या होत्या. प्रत्येक विभागाने उत्कृष्ट सहभाग नोंदवला आहे. शिक्षण विभागातून दहावी,बारावी परिक्षेत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. आरोग्य विभागा मार्फत गोल्डन कार्ड वितरीत केले जाते. विविध प्रशिक्षण आयोजित केले जाते. संपूर्ण अभियानात सहा मानके आहेत. गर्भवती महिला पोषक आहार, उच्च रक्तदाब, शुगर तपासणी, जमिनीचा पोत, बचतगटाची स्थापना केली आहे. त्यांना खेळते भांडवल उपलब्ध करुन दिले आहे. पंचक्रोशीत कोणीही दारिद्र्य रेषेखाल राहणार नाही या करीता सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी केले. यावेळी मृदा प्रशिक्षण अहवाल वाटप करण्यात आले. शेतकरी काशिनाथ पवार यांना वैयक्तिक शेततळे याचा लाभ देण्यात आला. प्रताप पाटील यांनी दररोज जेवणात सकाळ, संध्याकाळ भातच असतो यामधून प्रोटिन्स कमी मिळतात.यासाठी जेवणात विविधता असावी यासाठी अंगणवाडीत समुपदेशन केले जाते.
कार्यक्रमाची सुरुवात रॅलीने करण्यात आली, ज्यामध्ये शिक्षण विभाग, महिला- बाल विकास विभाग, आरोग्य विभाग, तालुका कृषी विभाग, आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती विभागाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी विविध माहितीपर फलके दाखवत तसेच घोषणा देत सहभाग घेतला. रॅलीनंतर नीती आयोगातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या चित्रफितिचे प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले, यामध्ये एकोणसत्तर लाभार्थ्यांनी लाभ घेतला. गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला होता. यामध्ये अठ््याण्णव स्त्रियांची तपासणी करण्यात आली. महिला व बालविकास विभागाच्या वतीने पौष्टिक आहाराचे महत्त्व सांगणाऱ्या विविध रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. जिल्हा नियोजन अधिकारी महिला व बालविकास विभाग प्रताप पाटील यांनी सर्व अंगणवाडी सेविकांना तसेच लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मार्गदर्शन केले. तालुका कृषी विभागातर्फे लाभार्थ्यांना सॉइल हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. शिबिराच्या शेवटच्या सत्रात नीती आयोगाने जाहीर केलेल्या प्रतिज्ञाचे जाहीर वाचन करण्यात आले आणि प्रत्येक लाभार्थ्याकडून त्यावर हाताचे ठसे व सही घेण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्णतः अभियानातील सेल्फी पॉईंटचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. फोटो- आकांक्षी तालुका कार्यक्रमात उपस्थितीतांना मार्गदर्शन करतांना उपमुखकार्यकारी वर्षा पडोळ. रॅलीत सहभागी वर्षा पडोळ.
आदिवासी सांस्कृतिक संकुल सुरगाणा येथे नीती आयोगाच्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमातील संपूर्णतः अभियानाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नीती आयोगातर्फे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्रीमती मानवी मेहता यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक (ग्राम पंचायत) श्रीमती वर्षा फडोळ, जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा परिषद नाशिक (महिला बाल विकास) प्रताप पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, तहसिलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी महेश पोतदार, गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे, डाॅ.दिलीप रणवीर, अभियंता मोरे, डॉ. लोणे, नियोजन सल्लागार नीती आयोगाचे विश्वजीत डोके, श्रीमती शुभी मॅडम आदी उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)