Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीयसाहित्यिक

β⇔सुरगाणा(नाशिक):”१७ संवर्ग पेसा भरती संदर्भात जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही,तोपर्यंत बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरुच राहणार”-जिवा गावित-माजी आमदार,(सुरगाणा-कळवण)-(प्रतिनिधी :डॉ.भागवत महाले)

β⇔सुरगाणा(नाशिक):"१७ संवर्ग पेसा भरती संदर्भात जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही,तोपर्यंत बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरुच राहणार"-जिवा गावित-माजी आमदार,(सुरगाणा-कळवण)-(प्रतिनिधी :डॉ.भागवत महाले)

018491

“नाशिक ते सापुतारा” (गुजरात) आंतरराज्य महामार्गावर पेसा भरती संदर्भात बेमुदत चक्का जाम आंदोलनात, सरकारचे डोके फिरले आहे, काय ? माजी आमदार जिवा गावित  यांचा सवाल 

β⇔सुरगाणा(नाशिक):"१७ संवर्ग पेसा भरती संदर्भात जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही,तोपर्यंत बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरुच राहणार"-जिवा गावित-माजी आमदार,(सुरगाणा-कळवण)-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)
β⇔सुरगाणा(नाशिक):“१७ संवर्ग पेसा भरती संदर्भात जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही,तोपर्यंत बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरुच राहणार”-जिवा गावित-माजी आमदार,(सुरगाणा-कळवण)-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)

१७ संवर्ग पेसा भरती संदर्भात जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही,तोपर्यंत बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरुच राहणार”- जिवा गावित-माजी आमदार,(सुरगाणा-कळवण)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  बुधवार  : दि, 21 ऑगस्ट  2024

β⇔सुरगाणा(नाशिक),दि.21(प्रतिनिधी :डॉ.भागवत महाले) :-सरकारचे डोके फिरले आहे काय? सर्वोच्च न्यायालयाचे काही एक म्हणणे नसतांना आदिवासी भागातील १७ संवर्ग पेसा भरती थांबवली आहे. असे ताशेरे माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी“नाशिक ते सापुतारा” गुजरात महामार्गावर ‘घागबारी -उंबरपाडा’ टोल नाका येथे सकल आदिवासी जमातींच्या वतीने बेमुदत चक्का जाम आंदोलनात सहभागी होत मार्गदर्शन करतांना केले.” या आंदोलनात गुजरातकडे जाणारा महामार्ग बंद करण्यात आला. यावेळी बेमुदत चक्का जाम आंदोलनात सकल आदिवासी कृती समितीचे माजी आमदार जिवा गावित,आदिवासी सेवक चिंतामण गावित, मोहन गांगुर्डे, भास्कर चौधरी, सखाराम भोये, जनार्दन भोये, चंद्रकांत वाघेरे, सुभाष चौधरी, कृष्णा चौधरी, सरोज भोये, मनोहर गायकवाड , नरेंद्र दळवी, काशिनाथ भोये, धनंजय गावित, हिरामण गावित, चंदर पवार, तुळशीदास पिठे, गणपत भोये, भाऊराव राऊत आदीसह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. तर सुरगाणा शहरात नितीन पवार, संजय पवार, इंद्रजीत गावित, सुभाष चौधरी, पांडुरंग गायकवाड, भरत पवार, अशोक धुम, भास्कर जाधव  यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

             यावेळी माजी आमदार गावित यांनी  आंदोलकांना  मार्गदर्शन करतांना म्हणाले, की ‘पेसा भरती संदर्भात ठाणे, पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी व्यक्तीने याचिका दाखल केल्याने शासनाने पेसा भरतीवर बंदी घालण्यात आली आहे.’ आज आदिवासी समाज सर्वच बाजुने होरपळून निघत आहे. सरकार तसेच इतर समाजाकडून लुटला जातो आहे. आदिवासींच्या विकासासाठी केंद्र सरकारने राज्यात पेसा कायदा लागू केला. मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी शासनाकडून हेतू पुर्वक केली जात नाही, ग्रामपंचायतीला फारथोडा निधी दिला जातो. याशिवाय कोणतेही विकास कामे केले जात नाही. देशातील एकमेव त्रिपुरा राज्याने पेसा कायद्याची अंमलबजावणी केली आहे. पेसा ही काय भानगड आहे, हे येथील अधिका-यांनाच अजून माहीत नाही, अशी टीका त्यांनी केली.

           पुढे म्हणाले की ,  आदिवासींच्या योजना लाभार्थी पर्यंत पोहचू द्यायच्या नाहीत, हाच सरकारचा डाव आहे. त्यामुळे पेसा क्षेत्रात नोकर भरती केली जात नाही. या महत्त्वाच्या प्रश्नांवर आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या चर्चा करून विनंती केली आहे. मात्र तोडगा ते काढू शकले नाहीत. हजारो आदिवासी मुले शिक्षण घेऊन सुशिक्षित बेरोजगार झाले आहेत. त्यांना लायकी नुसार सरकार नोक-या देऊ शकत नाही, त्यांची चेष्टा सुरु आहे. आदिवासींना सर्व बाजूंनी पोखरण्याचे काम सुरु आहे. शाळेत शिक्षक नाही, ग्रामपंचायतीत ग्रामसेवक नाही, अनेक कार्यालयात कर्मचारी नाहीत. अशाने आदिवासींचा विकास कसा  होईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पेसा भरती संदर्भात जो पर्यंत सरकार चर्चेसाठी बोलावत नाही, तोपर्यंत हे बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक कार्यालयात आदिवासींची आर्थिक पिळवणूक केली जाते. एखाद्या क्षुल्लक कामासाठी आदिवासींना गरगर फिरवले जाते. तहसील कार्यालयात साधे रेशन कार्ड, आधार कार्ड काढायला पैशाची मागणी केली जाते अशा आरोप केला. पेसा क्षेत्रात वन जमीन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, राज्यातील तेरा जिल्ह्यात पेसाची प्रभावी अंमलबजावणी करा. १७ संवर्ग पेसा क्षेत्रात भरती करा अशा मागण्या या आंदोलनात केल्या आहेत.

           दरम्यान रात्री आठ वाजेपर्यंत आंदोलक ‘घागबारी – उंबरपाडा’ येथे ठाण मांडून रस्त्यावर बसले होते. या आंदोलनात सकाळी हजारो तरुण बेरोजगार सहभागी झाले होते. या चक्का जाम आंदोलनात तालुक्यातील सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. याचा प्रभाव बा-हे, उंबरठाण, पळसन, बोरगाव, पांगारणे, सुरगाणा शहरात अगदीच दिवसभर शुकशुकाट आढळून आला.

β⇔सुरगाणा(नाशिक):"१७ संवर्ग पेसा भरती संदर्भात जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही,तोपर्यंत बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरुच राहणार"-जिवा गावित-माजी आमदार,(सुरगाणा-कळवण)-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)
β⇔सुरगाणा(नाशिक):”१७ संवर्ग पेसा भरती संदर्भात जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही,तोपर्यंत बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरुच राहणार”-जिवा गावित-माजी आमदार,(सुरगाणा-कळवण)-(प्रतिनिधी:डॉ.भागवत महाले)

  फोटो- “नाशिक-गुजरात” महामार्गावर चक्काजाम आंदोलन प्रसंगी ‘घागबारी -उंबरपाडा’ चेक नाका येथे मार्गदर्शन करतांना माजी आमदार जिवा पांडू गावित सह आंदोलक.

                  -:  सुरगाणा चक्का जाम आंदोलनातील क्षणचित्रे  :-

            १) तालुक्यात आरोग्य सेवा, औषध दुकाने वगळता तहसिल, पंचायत समिती, बॅंका, कृषी विभाग सह सर्वच कार्यालये बंद करण्यात आल्याने शहरात सकाळ पासूनच शुकशुकाट आढळून आला. २) आंदोलनाची झळ पळसन, उंबरठाण, बोरगाव, बा-हे, पांगारणे या अगदी दुर्गम, अतिदुर्गम भागात पहायला मिळाली. ३) आदिवासी बांधवांनी अगदीच स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. ३) सुरगाणा शहरातील वणी रस्ता, माणी, उंबरठाण, पळसन ,बोरगाव रस्त्यावर आंदोलक ठाण मांडून बसले होते. ४) जय आदिवासी असे ध्वज फडकवत ठिकठिकाणी सरकार विरोधी जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. ५) बॅंकेचे व्यवहार ठप्प असल्याने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे महिलांना काढता आले नाहीत. ६) शहरात सर्वत्र शुकशुकाट आढळून आला. ७) तहसिल, पंचायत समितीच्या कार्यालयांना टाळे ठोकल्याचे आढळून आले. ८)सुरगाणा शहरातील मराठी शाळा दुपारनंतर पालकांनी विद्यार्थ्यांना घरी  बोलावून घेतल्याने शालेय परिसर ओस पडला. ९) दिवसभर ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता सुशिक्षित बेरोजगार तरुण रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. १०) ‘घागबारी -उंबरपाडा’ चेक नाका येथे गुजरात कडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. ११) काही वाहनांनी वणी, नांदुरी, अभोणा, कनाशी, हतगड या मार्गे गुजरातकडे वाहने वळविली. १२) सुरगाणा तालुक्यात येणारे चाकरमानी यांनी बा-हे, ननाशी, उमराळे या मार्गे घरचा रस्ता धरला. १३) रात्रीआठ वाजेपर्यंत “धो – धो ” पावसात आंदोलन सुरू होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.                           ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!