





मनमाड युनियन बँकेच्या पिडीत ठेवीदारांचे पैसे त्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करा –डॉ भारती पवार

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 1 जून 2024
β⇔ नाशिक ,दि.1 (प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):- मनमाड येथील युनियन बँकेच्या (Union Bank) विमा प्रतिनिधीने बँकेच्या मुदत ठेवीदारांनी ठेवी भरण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी दिलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता.
यानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालत नाशिक येथे युनियन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन युनियन बँक एफडी घोटाळा प्रकरणी ठेवीदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर जी काही मदत लागेल ती मदत मिळवून देण्याचे आश्वस्त केले.

यावेळी काही पिडीत ठेवीदारांच्या रकमेचे पत्रक डॉ.भारती पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आले असून उर्वरित सर्व ठेवीदारांचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतील, असे बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.तरीही कुणाला याबाबत शंका व तक्रार असल्यास आपण थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधवा , अशी विनंती डॉ भारती पवार यांनी केली.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )