β : दिंडोरी :⇔ शिक्षक परिषद येवला तालुका मेळाव्याला भरभरून प्रतिसाद तालुकाध्यक्षपदी प्रशांत शिंदे तर कार्यवाहपदी किरण काकडे-(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव)
β : दिंडोरी :⇔ शिक्षक परिषद येवला तालुका मेळाव्याला भरभरून प्रतिसाद तालुकाध्यक्षपदी प्रशांत शिंदे तर कार्यवाहपदी किरण काकडे-(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव)
शिक्षक परिषद येवला तालुका मेळाव्याला भरभरून प्रतिसाद
तालुकाध्यक्षपदी प्रशांत शिंदे तर कार्यवाहपदी किरण काकडे
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 04 मार्च 2024
β⇔: दिंडोरी : दि,3(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग येवला तालुका मेळावा राज्य कार्यवाह /सरचिटणीस संजय बबनराव पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये जिल्हा नेते रमेश रघुनाथ गोहिल, प्रतिनिधी तथा दिंडोरी तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव, उपाध्यक्ष दिपक खैरनार यांनी संघटनेच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली.तर जिल्हा कोषाध्यक्ष सुनील यमाजी अहिरे यांनी संघटनेचा निधी खर्च याबाबत व सभासद हिचा विनियोग कसा केला जातो, हे सांगितले. येवला तालुका मेळाव्यात शिक्षक परिषदेचा कामाचा धडाका पाहून तालुक्यातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रवेश शेकडो शिक्षकांनी स्वीकारली सभासदत्व. याप्रसंगी राज्य कार्यवाह संजय बबनराव पगार यांनी शिक्षक परिषदेने आज पर्यंत शिक्षक बदल्या, वादग्रस्त अधिकाऱ्यांना विरोधातील आंदोलन, बोगस दिव्यांग आंदोलन तसेच निवड श्रेणी आंदोलनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचे अनुभव कथन केले.
शिक्षक परिषद आंदोलन हाती घेताना कशा प्रकारे तयारी करते व शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांशी योग्य विषयावर योग्य दिशेने चर्चा करून आंदोलन यशस्वी करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला जातो.यापुढे शिक्षक परिषद चटोपाध्याय वेतनश्रेणी, शालेय पोषण आहार, जिल्हा बदली वेतनश्रेणी, महिलांचे प्रश्न, शिक्षकांचे वैयक्तिक व सामूहिक प्रमुख प्रश्न सोडवले जातील.परिषदेच्या आजच्या मेळाव्यात आपण भरभरून साथ दिली तुमच्या सर्वांच्या न्याय हितासाठी शिक्षक परिषद अविरत कार्यरत राहील . येवला तालुक्यात जेव्हा जेव्हा शिक्षक बोलावतील तेव्हा येवला कार्यकारणी सोबत स्वतः हजर राहून लक्ष घालून कामे मार्गी लावले जातील. असे पगार यांनी सांगितले.
येवला तालुक्यातील सभासद नोंदणी केल्यानंतर तालुका कार्यकारणी खालील प्रमाणे घोषित करण्यात आली तालुकाध्यक्ष- प्रशांत कृष्णा शिंदे, सरचिटणीस -किरण त्रिंबकराव काकडे, कार्याध्यक्ष- बाळू बाबुराव आहेर,कोषाध्यक्ष -मुकुंद नामदेव मोरे ,संघटनमंत्री -विलास गेनुजी शिंदे, सहकार्यवाह – दत्तात्रय सोपान कमोतकर ,उपाध्यक्ष अनिल किसन धनवटे,सल्लागार -विजय कारभारी ठाकरे,सेवानिवृत्त प्रतिनिधी -अरुण जयवंतराव पवार तसेच महिला आघाडीमध्ये ललिता अनिल धनवटे व ज्योती बाळकृष्ण मोरे सहभागी झाल्या.
मेळाव्यात जिल्हा नेते रमेश गोहिल, कोषाध्यक्ष सुनील अहिरे , प्रतिनिधी /तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव,उपाध्यक्ष दीपक खैरनार, प्रवीण देशमुख, नाशिक शिक्षक बँक संचालक अरविंद माळी, जिल्हा सल्लागार मनोज सोनवणे, दिंडोरी कार्यकारी अध्यक्ष अशोक पवार, कार्यकारणी सदस्य विलास शिरोडे उपस्थित होते.तसेच येवला तालुक्यातील शिरीष सूर्यवंशी, गोकुळ वाघ ,राजेंद्र दुनबळे, साहेबराव होंडे, भारत कानडे,राजेंद्र शिंपी, उदयकुमार कुऱ्हाडे, विलास बांगर, नानासाहेब गोराणे या इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील संजय पगार यांचा निवड श्रेणी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल सत्कार केला. मेळाव्यात निंबा शिंदे ,बाबासाहेब दरेकर ,शांताराम लांडगे ,पवार अशोक पवार ,विजय देवरे, कैलास जोरवर ,गोकुळ गायकवाड ,राजेंद्र गाडे ,रावसाहेब येवले ,कैलास रोडे ,मोहन सावंत ,अरुण पाटील, सुभाष निकुंभ ,भगवान गायकवाड ,संगीता गायकवाड, सुलोचना वसावे, अंजली मांजरे आदी शिक्षक उपस्थित होते.
-“शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस संजय पगार व जिल्हा कार्यकारिणीने माझ्यावर विश्वास दाखवून येवला तालुक्याची जबाबदारी दिली त्या शिक्षक परिषद राज्य सरचिटणीस संजय पगार व जिल्हा कार्यकारिणीने माझ्यावर विश्वास दाखवून येवला तालुक्याची जबाबदारी दिली तालुकाध्यक्ष पदाला न्याय देऊन शिक्षक हितासाठी अविरत कार्य करत राहील,” – प्रशांत कृष्णा शिंदे , – तालुकाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद येवला.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. 8208180510