





दिलीप गावित पॅरा ओलंपिक्स 400 मी. स्पर्धेत पात्रता स्पर्धेत यशस्वी, मुख्य स्पर्धा 7 सप्टेंबर ला होणार, देशभरातून अभिनंदन

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 06 सप्टेंबर 2024
β⇔नाशिक, दि.06 (प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):- सुरगाणा तालुक्याचा आदिवासी कोहिनूर हिरा दिलीप महादू गावित (तोरणडोंगरी ) याने पॅरा ओलंपिक्स 400 मी. स्पर्धत पात्रता स्पर्धेत यशस्वी ठरला त्याने 49.54 सेंकदात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तो स्पर्धा खेळण्यास पात्र ठरला आहे,त्यामुळे देशभरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुरगाणा तालुक्यातील जनतेमध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे. आदिवासी भागातील गरीब विद्यार्थी जिद्दी व चिकाटीच्या जोरावर पॅरीस पॅरा ओलंपिक्स क्रीडा पात्रता स्पर्धेत यश संपादन केले आहे. त्यामुळे सुरगाणा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत असून त्याच्याकडून पदकाची अपेक्षा होत आहे. सुरगाणासह नाशिक जिल्हयाचे नाव रोशन करणार आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ.भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )