वसंत व्याख्यानमालेच्या कार्यकारिणीचा सत्कार
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि ३० सप्टेंबर २०२३
β⇒ नवीन नाशिक, ता.२९ ( प्रतिनिधी : कृष्णा शहाणे ) :- शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेचे सुयोग्य नियोजन करून यशस्वीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल महावीर इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने वसंत व्याख्यानमालेच्या पदाधिकाऱ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
गंजमाळ येथील रोटरी सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात वसंत व्याख्यानमालेच्या पदाधिकाऱ्यांचा नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत सत्कार करण्यात आला .याप्रसंगी वसंत व्याख्यानमालेच्या वतीने अध्यक्ष श्रीकांत बेनी, प्रा.डॉ.कृष्णा शहाणे, विजय काकड, ॲड. कांतीलाल तातेड आदींनी सत्कार स्वीकारला.
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले :मो.८२०८१८०५१०