





तिसगाव शाळेत विद्यार्थ्यांनी घेतला गोपाळकाला दहीहंडी उत्सव साजरा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 27 ऑगस्ट 2024
β⇔दिंडोरी, 26 (प्रतिनिधी : रावसाहेब जाधव ):- जिल्हा परिषद शाळा तिसगाव (ता. दिंडोरी) येथे आज गोपाळकाला दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत आले होते. यामध्ये श्रीकृष्ण, राधा, यशोदा यांच्या वेशात विद्यार्थिनी आल्या होत्या. विद्यार्थी व शिक्षकांनी ही वेगवेगळ्या गीतांवर ताल धरला. दहीहंडी प्रसादासाठी इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी योगदान दिले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना लोहकरे, पदवीधर शिक्षक रावसाहेब जाधव, प्राथमिक शिक्षिका श्रीमती ताईबाई आहिरे, श्रीमती अरुणा जाधव, प्राथमिक शिक्षक दिपक वसावे, प्रमोद देवरे आदी उपस्थित होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )