β : लखनौ :⇔भोले बाबा यांच्या हाथरस सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी; शंभरहून अधिक 116 भाविक मृत्युमुखी-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)
β : लखनौ :⇔भोले बाबा यांच्या हाथरस सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी; शंभरहून अधिक 116 भाविक मृत्युमुखी-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)
भोले बाबा यांच्या हाथरस सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी ; शंभरहून अधिक 116 भाविक मृत्युमुखी
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. 2 जुलै 2024
β⇔ लखनौ, दि.2 (प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले):-“उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस जिल्ह्यातील सिकंदरा राऊ जवळच्या मोगल गडी आगावात आयोजित नारायण साकार हरी भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमात जमलेल्या भाव भक्तांमध्ये चेंगराचेंगरी होऊन शंभरहून अधिक 116 भाविक मृत्युमुखी पडल्याची घटना आज मंगळवारी घडली आहे. सदर घटनेने उत्तर प्रदेश मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान नारायण साकार हरी भोले बाबा यांच्या सत्संग संपल्यानंतर भाविकांनी घरी जाण्यासाठी एकच गर्दी केली त्यामुळे त्यांच्या चेंगराचेंगरी होऊन सुमारे शंभरहून अधिक भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक जखमी झाल्याची वृत्त आहे. भाविकांना एटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये पुरुष महिला ,लहान मुले देखील आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयाची आणि जखमींना 50 हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे. एक्स ट्विटर या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयात हाथरस मध्ये झालेल्या घटनेत मृत्यू पावलेल्या कुटुंबात सहवेदना व्यक्त केली आहेत. हेल्पलाइन नंबर 05722227041/05722227042
सदर घटनेचे वृत्त असे की नारायण साकार हरी भोले बाबा सुटा बुटात राहणाऱ्या हरिबाबा उर्फ भोले बाबाचे खरे नाव सुरज पाल आहे 17 वर्षांपूर्वी पोलीस कॉन्स्टेबलच्या नोकरीत होते. मात्र त्यांनी नोकरी सोडून ते सत्संग करायला लागले तेव्हा नोकरी सोडल्यावर सुरज पाल नाव बदलून नारायण साकार हरी भोले बाबा नाव धारण केले. बाबा सर्वसामान्य साधूप्रमाणे भगवी वस्त्र धारण न करता शर्ट पॅन्ट महागडे गॉगल वापरतात त्यांच्या राहणीमानामुळे मोठ्या प्रमाणात शिष्य आहेत. हे शिष्य त्यांना भोले बाबा म्हणून संबोधतात उत्तर प्रदेश शिवार शिवाय राजस्थानामध्ये त्यांची शिष्य मोठ्या प्रमाणात आहेत. साकार हरीबाबा आपल्या सत्संगातून मानवसेवेचा संदेश देतात, मानव सेवा सर्वात मोठी सेवा असल्याची ती सांगतात. सत्संगात येणाऱ्या लोकांचे रोग दूर होतात, मग मन शुद्ध होते, येथे कोणताही भेदभाव नाही. कोणतेही दान नाही, कोणतेही पाखंड नाही, इथे सर्व समभाव आहे, ब्रह्मलोक आहे, येथेच सर्व स्वर्ग आहे, असे ते सांगतात. इतर साधुसंतांपेक्षा त्यांचे वेगळेपण दिसून येते असं भक्तांमधून वृत्त आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)