





स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात मार्फत भेसळयुक्त दूध व दूध संकलन केंद्रावर नियंत्रण
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि.25 मार्च 2024
β⇔ सिन्नर( ( नाशिक),दि25 ( प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- सिन्नर तालुक्यातील पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी काही दिवसापूर्वी तालुक्यातील दूध संकलन केंद्राकडे दूध देणाऱ्या व संकलन केंद्राकडून पुढे पाठवण्यात येणाऱ्या दुधाची माहिती हे स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात देण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली होती.
त्यानुसार तहसीलदारांनी संकलन केंद्राकडून माहिती घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला केल्या होत्या. बैरागी यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनात संपूर्ण जिल्ह्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. त्यावर जिल्हा अधिकाऱ्यासह जिल्हा परिषदेने तालुक्यातील सर्व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना त्याप्रमाणे सूचना दिल्या होत्या. परंतु त्यावर अंमलबजावणी होत नसल्यामुळे बैरागी यांनी पांगरी येथे उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, सुरुवातीला प्रशासनाने त्यांच्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती. तरी देखील त्यांनी तहसीलदार जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. अखेर त्यांच्या लढ्याला यश आले असून आता जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेने दूध संकलनाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाकडे न देणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिला आहेत. त्यामुळे बैरागी यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
β⇔दिव्य भारत बी एस एम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो.8208180510