





“व्रत अमृता” फूड फेस्टिवलचे उद्घाटन नाशिकमध्ये, सलोनी जहागीरदार यांच्या हस्ते

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि 10 ऑक्टोबर 2024
β⇔ नाशिक( शहर): ता.10 ( प्रतिनिधी : छाया लोखंडे ):- नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एस.एम.आर.के.बी.के.ए.के. महिला महाविद्यालयाच्या एच.एस.सी. व्होकेशनल विभागातर्फे आयोजित “व्रत अमृता” फूड फेस्टिवलचे उद्घाटन जहागीरदार फूड्सच्या सलोनी जहागीरदार यांच्या हस्ते करण्यात आले. फूड प्रॉडक्ट्स टेक्नॉलॉजीच्या शिक्षिका वैशाली चौधरी यांनी या फूड फेस्टिवलची पार्श्वभूमी स्पष्ट केली. संस्थेच्या सचिव डॉ. दीप्ती देशपांडे यांनी या फेस्टिवलसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर, उपप्राचार्य प्रो. डॉ. नितीन सोनगीरकर, कला व ललित कला शाखेचे समन्वयक प्रो. डॉ. अविराज तायडे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक शोभा त्रिभुवन, तसेच एच.एस.सी. व्होकेशनल विभागाच्या समन्वयक मैथिली लाखे आणि इतर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींनी उपवासासाठी उपयुक्त असे नाविन्यपूर्ण पदार्थ तयार केले होते. फूड प्रॉडक्ट्स टेक्नॉलॉजी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी हेल्दी व्रत खाऊसारखे क्रिस्पी बकव्हीट नॅचोस, यम्मी व्रत टार्ट, उपवास दहिवडा, उपवास कचोरी यांसारखे अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले. यामधून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून विक्री करण्याचे कौशल्य आत्मसात झाले.
टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थिनींनी भारतातील विविध शक्तिपीठांची माहिती सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वैशाली चौधरी, वैशाली गायकवाड आणि संजोग आहिरवार यांनी विशेष प्रयत्न केले.

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )