Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : सुरगाणा :⇒ ” सुरगाणा –  मधला  तळपाडा – अहवा ” महाराष्ट्र – गुजरात आंतरराज्य महामार्ग केवळ ३ किमी रस्ता अतिशय खराब झाल्याने बस सेवा बंद , रुग्ण, प्रवाशी, नागरिकांचे हाल ! त्वरित  डाबरीकरणाची मागणी ! ( प्रतिनिधी : भागवत महाले )

β : सुरगाणा :⇒ " सुरगाणा -  मधला  तळपाडा - अहवा " आंतरराज्य महामार्गाची दुरवस्था , रस्ता पूर्णपणे  उखडल्याने  खडी व चिखलाचे साम्राज्य, नागरिक त्रस्त त्वरित  डाबरीकरणाची मागणी ! ( प्रतिनिधी : भागवत महाले )

0 0 2 8 6 9

 ” सुरगाणा- मधला  तळपाडा –आहवा आंतरराज्य महामार्गाची दुरवस्था , रस्ता पूर्णपणे  उखडल्याने  खडी व चिखलाचे साम्राज्य, त्वरित  डाबरीकरणाची मागणी !  

महाराष्ट्र – गुजरात आंतरराज्य महामार्ग केवळ ३ किमी रस्ता अतिशय खराब झाल्याने बस सेवा बंद , रुग्ण, प्रवाशी, नागरिकांचे हाल !

  ⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : नाशिक : शुक्रवार : दि. २५ , ऑगस्ट 2023

⇒ सुरगाणा,  ता.२५  ( दिव्य भारत बी एस एम न्यूज : प्रतिनिधी : भागवत महाले ) :- महाराष्ट्र – गुजरात आंतरराज्य महामार्ग केवळ ३ किमी.अंतर रस्ता अतिशय खराब झाल्याने “अहवा – मधला तळपाडा- सुरगाणा” बस सेवा दोन वर्षापासून बंद करण्यात आली आहे. गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या तीन बसेस सुरु होत्या. सदर बस दोन वर्षांपासून  गुजरातमधील आहवा डेपो येथून “अहवा – मधला तळपाडा -सुरगाणा ” या महामार्गाने येणा-या तीन बसेस सुरगाण्याजवळील “मधला तळपाडा- सुरगाणा ” हा तीन किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाल्याने बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बसेस केवळ गुजरात सीमेवरील माळुंगा गावापर्यतच येत आहेत. मात्र यामुळे दोन्हीं राज्यातील नागरिक ,रुग्ण , विद्यार्थी, प्रवाशांचे अतोनात खुपच हाल होत आहेत.
           सदर मार्ग आंतरराज्य महामार्ग असताना कोणताही पुढारी अथवा नेता लक्ष देत नाही . वाहने नसल्याने रुग्णांना पायपीट करत रुग्णालयात जावे लागत आहे. कामानिमित्त या मार्गावर प्रवास करणा-यांना अडचणीचे ठरत आहे. गुजरातमधील “आहवा हे सुरगाणा ” शहरापासून ५८ किलोमीटर आहे. यातील गुजरातधील ५५ किलोमीटरचा दोन पदरी रस्ता उत्कृष्ट असून फक्त महाराष्ट्रातील “सुरगाणा ते मधला तळपाडा – देवळाचा तळपाडा  – आहवा ” हा ३ किलोमीटर रस्ता अतिशय खराब झाल्याने या बस बंद करण्यात आल्या आहेत. सदर आंतरराज्य महामार्गवर आहवा डेपोच्या दिवसभरात तीन बसेस सकाळी साडेआठ वाजता, दुपारी दीड वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता मुक्कामी बस सुरगाणा येथे येत होत्या. मागील जुलै- ऑगस्ट महिन्याच्या पावसाळ्यात सापुतारा घाटात दरड कोसळल्याने महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्र- गुजरात महामार्ग नाशिक ते गुजरात प्रवाशी वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून  “आहवा- माळुंगा- सुरगाणा – मधला तळपाडा – नाशिक ” या मार्गाचा वापर अवजड वाहतूकदार , बस प्रवाशी वाहतूक, ट्रक, बस चालक, कार, ट्रॅक्टर, भाजीपाला वाहतूक करत होते. अगोदरच खराब असलेला रस्ता अवजड वाहतुकीमुळे अजून खराब झाला आहे. यामुळे खासगी वाहन या मार्गावरून नेण्यास  वाहनचालक नकार देत असल्याने या मार्गावरील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
                     मात्र हा रस्ता खराब झाल्याने गुजरात परिवहन विभागाच्या अधिका-यांनी रस्त्याची पाहणी केल्यानंतर बस बंद करण्याचा नाईलाजास्तव निर्णय घेतला, अशी माहिती आहवा डेपोचे मॅनेजर के. ए. परमार यांनी दिली. सदर डेपोने या बस बंद करण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी घेतला. तेव्हापासून योग्य रस्त्या अभावी या मार्गावर बससेवा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. “सुरगाणा ते मधला तळपाडा – देवळाचा तळपाडा  ” हा ३ किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करुनही प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. शासनाने या मार्गाचा त्वरित दुरुस्ती करून मजबूत डांबरीकरण करावे, अशी मागणी शंकर महाले, बापू देशमुख, दिनकर देशमुख , भास्कर महाले , तुळशीराम महाले ,  भागवत महाले, रमेश महाले, मोहनदास महाले, विजय महाले, देवेंद्र देशमुख , भागवत गावीत, यशोदाबाई महाले, हिराबाई महाले, रंजना देशमुख, भारती महाले, आदीसह परिसरातील नागरिक , प्रवाशी, विद्यार्थी व शेतकऱ्यांनी जोरदार मागणी केली आहे.
                 सहा महिन्यांपुर्वी गुजरात राज्यात सुरगाणा तालुक्याचा समावेश करण्याची मागणी करून ही अजून शासनाने सुरगाणा तालुका विकासापासून वंचित ठेवला जात आहे ,हा  रस्ता खराब असल्याने रूग्णालयात उपचार घेणे त्रासदायक आहे, पिण्याचे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, वीज नेहमी गायब असते त्यामुळे विद्यार्थी व शेतकऱ्याना खुपचं त्रास सहन करावा लागत आहे. मात्र लोक अशिक्षित ,गरीब असल्याने  पुढारी  धमक्या देत असतात ,त्यामुळे  घाबरून  नागरिक तक्रार करत नसतात . याच कारणास्तव  विकास झालेला नाही, म्हणून  मुख्यमंत्री , पालकमंत्री , जिल्हाधिकारी यांनी  लक्ष  घालून मागणी पूर्ण करावी , अशी प्रतिक्रिया भागवत महाले यांनी दिली आहे.

सुरगाणा-सुरगाणा-तळपाडा-अहवा-रस्ता-दुरुवस्था-चिखलाचे-साम्राज्य.

सुरगाणा-:सुरगाणा-तळपाडा-अहवा-रस्ता-दुरुवस्था-चिखलाचे-साम्राज्य   ( फोटो- शाश्वत महाले )

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 6 9

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!