0
1
4
9
1
9
‘डोनेट अ बुक ‘ उपक्रमांतर्गत खोकरी शाळेला नवोदय मार्गदर्शक पुस्तिका वाटप
β ⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज :प्रतिनिधी – बोरगाव :- लक्ष्मन बागुल
β ⇒ बोरगाव, ता २ (दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खोकरी येथे नाशिक येथील पदवीधर शिक्षक वाल्मीक चव्हाण यांनी डोनेट अ बुक या उपक्रमांतर्गत दिलेल्या पुस्तिकांचे अलंगुण बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कोळी यांच्या हस्ते नवोदय परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थांना वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक नारायण गवळी, तुकाराम भोये, उपशिक्षक पांडुरंग पवार, महेंद्र कडवा, हरीचंद्र गावित उपस्थित होते. वाल्मीक चव्हाण यांच्या या उपक्रमाविषयी सुरगाणा पंचायत प्रभारी गटशिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे यांनी अभिनंदन केले आहे.
β ⇒