β : नाशिकरोड :⇒ चेहेडी पंपिंग संकुल चौफुलीच्या सुशोभीकरणाची मागणी ! ( प्रतिनिधी : पांडुरंग गुरव )
β : नाशिकरोड :⇒ चेहेडी पंपिंग संकुल चौफुलीच्या सुशोभीकरणाची मागणी ! ( प्रतिनिधी : पांडुरंग गुरव )
चेहेडी पंपिंग संकुल चौफुलीच्या सुशोभीकरणाची मागणी !
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि 7 सप्टेंबर 2023
β⇒ नाशिकरोड, (चेहडी) : ता. 7 ( प्रतिनिधी : पांडुरंग गुरव ) चेहेडी पंपिंग निवारा संकुल चौफुलीचे सुशोभीकरण करून याठिकाणी हायमास्ट बसविण्यात यावा, अशी मागणी गुरव समाज सामाजिक बहुउद्देशीय सेवा संस्थेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात नाशिक रोड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
पुणे महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. त्यामुळे चेहेडी पंपिंगमार्गे सिन्नर व पाथर्डीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर वाढला आहे , सदर जवळचा मार्ग असल्याने वाहनधारकां याच मार्गाचा अधिक मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत . या भागात शाळा, महाविद्यालयांचीही मोठी संख्या असल्याने विद्यार्थी ये-जा करत असतात. सध्या ही चौफुली घाणीच्या साम्राज्य पसरल्याने दुरवस्था झाली आहे , म्हणून चौफुलीचे सुशोभीकरण करण्याची गरज असून भौतिक सुविधा पुरवण्याची नागरिकांची मागणी आहे. अपघात टाळण्यासाठी याठिकाणी हायमास्ट बसविण्याचीही गरज आहे. महापालिकेने स्मार्ट सिटीअंतर्गत हे काम केल्याचे समाधानही लाभेल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर पांडुरंग गुरव, सदाशिव बोराडे, संजय आडके, रविशंकर गुरव, मुकुंद सोनार, ओंकार गुरव, ऋषिकेश गुरव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०