Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगसंपादकीय

β⇒ बोरगांव : वांगण( सु)  शेतकऱ्यांचा पुरात वाहून मृत्यू, तालुक्यात  हळहळ व्यक्त-  ( प्रतिनिधी : लक्ष्मन बागुल ) 

वांगण( सु) येथील शेतकऱ्यांचा पुरात वाहून मृत्यू.

0 0 2 3 9 8

वांगण( सु)  शेतकऱ्यांचा पुरात वाहून मृत्यू, तालुक्यात  हळहळ व्यक्त 

  

 β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज – बोरगांव प्रतिनिधी : लक्ष्मन बागुल 

 β बोरगांव ,ता . २२ (दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) : – सुरगाणा तालुक्यातील वांगण( सु) येथील रहिवासी शेतकरी देवराम काशिराम भुसारे (वय ४२ ) यांचा मृतदेह वांगण( सु) येथील भोवची चोंड नदीच्या पात्रातील पुराच्या पाण्यात आढळून आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलीस पाटील परशुराम चौधरी यांनी सांगितले की, मयत देवराम काशिराम भुसारे यांनी घरी सांगितले की मी शेतातील घरी जाऊन येतो, असे सांगून घरातून निघून गेले होते. सायंकाळी न परतल्याने गावात, नातेवाईक यांच्याकडे शोधा- शोध केली मात्र ते आढळून आले नाहीत. पाऊस खुपच असल्याने नदीला पूर आला होता. त्या पुरात वाहून गेल्याने  त्यांचा मृत्यू देह भोवची चोंड नदीच्या काठावर आढळून आला. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात कळविले असता, त्यांनी ओळख पटवून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.  तलाठी जितेंद्र भोंडवे, पोलीस हवालदार दिलिप वाघ, ग्रामसेवक गावित यांनी पंचनामा केला आहे. या प्रसंगी पोलीस पाटील परशराम चौधरी, नानाजी राऊत चंद्रकांत टोपले, यशवंत भुसारे, विनायक भोये, विनोद भुसारे, देवाजी टोपले, मोहन चौधरी आदी ग्रामस्थ पंचनामा प्रसंगी उपस्थित होते.  सुरगाणां तालुक्यात     आकस्मित मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

 β ⇒  दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा  : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले , मो.८२०८१८०५१० 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 3 9 8

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!