β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि, 29 ऑगस्ट 2024
β⇔ त्र्यंबकेश्वर, 29 (प्रतिनिधी : खास प्रतिनिधी ) :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, त्र्यंबकेश्वर येथे दि. २८/८/२०२४ रोजी वाणिज्य मंडळाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सुजाता गडाख, प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सुजाता गडाख ह्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार होते.
यावेळी वाणिज्य मंडळ उद्घाटन भाषणात बोलतांना डॉ. सुजाता गडाख म्हणाल्या ,की वाणिज्य म्हणजे काय ? वाणिज्य अभ्यासाचा आपल्या जीवनशैलीशी असणारा घनिष्ठ संबंध, वाणिज्य क्षेत्रातील विविध संधी आणि उद्योग क्षेत्रातील तरुण युवकांसाठी स्टार्ट अपचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार म्हणाले की, “जगाच्या नकाशावर धार्मिक क्षेत्र म्हणून त्र्यंबकेश्वरचे नाव आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी वेगवेगळे व्यवसाय उद्योग सुरु करुन करिअरमध्ये प्रगती केली पाहिजे आणि भारत देश महासत्ता होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी उद्योजकांची चरित्रे वाचून प्राप्त ज्ञान व कौशल्ये यांच्या जोरावर स्वत:चे ध्येय ठरविले पाहिजे म्हणजे जीवनात दिशा सापडेल.” असे त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागप्रमुख प्रा. श्रीमती नीता पुणतांबेकर यांनी केले. प्रा. श्रीमती शाश्वती निरभवणे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. श्रीमती श्वेताली सोनवणे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक, वाणिज्य आणि कला शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)