





प्रा. सौ. नीता कुलकर्णी यांना “महिलारत्न पुरस्कार”प्रदान

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 15 मार्च 2024
β⇔नाशिक रोड, दि,15(प्रतिनिधी : संजय परमसागर): नाशिकरोड येथील प्रा. नीता कुलकर्णी यांनी आजवर २५ वर्ष गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयात गणित विषयाचे दर्जेदार अध्यापन केले. त्याचबरोबर ‘संगीत ‘ व ‘निसर्ग चित्र पेंटिंग’ क्षेत्रात बहुमोल कामगिरी बजावली आहे. तसेच त्यांनी लिहिलेला ‘ कॅनव्हास ‘ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. स्वयंविकास प्रबोधिनीच्या सरचिटणीस म्हणूनही त्यांनी विविध शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहभाग झाला आहे. या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना “महिलारत्न पुरस्कार “प्राप्त झाला आहे.
प्रा. सौ. नीता कुलकर्णी यांना जागतिक महिला दिनानिमित्त ‘सुप्रीम एज्युकेशन अँड मेडिकल फाउंडेशन ‘तर्फे शिक्षण क्षेत्रातील “महिला रत्न पुरस्कार” डॉ. प्रशांत भुतडा, पी. शशिकांत, डॉ. राम कुलकर्णी या मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिकरोड येथील माहेश्वरी भवन मध्ये सदर पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510